डोनाल्ड ट्रम्प यांची हवा, लॉंच होताच 'ट्रुथ सोशल ॲप' पोहचलं टॉपवर

donald trump social media app truth social becomes most downloaded app on apple app store
donald trump social media app truth social becomes most downloaded app on apple app store
Updated on

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जगातील सर्व सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्यात आली, त्यांनंतर गेल्या एक वर्षापासून ट्रम्प जगभरातील लोक वापरत असलेल्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाहीत. सर्व साइट्सवरील निर्बंधानंतर ट्रम्प यांचे स्वतःचे ट्रुथ सोशल ॲप (Truth social app) नावाचे ॲप लॉन्च करण्यात आले आहे. Apple ॲप स्टोअरवर लॉन्च झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात Truth social हे सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप बनले आहे.

21 फेब्रुवारी रोजी, ॲप स्टोअरवरील सोशल मीडिया कॅटेगरीतील टॉप फ्री ॲप्सच्या यादीत Truth तिसऱ्या क्रमांकावर होते. लॉंचींगच्या आधी यासाठी प्री-ऑर्डरची सुविधा देण्यात आली होती. टॉप ॲप्सच्या यादीत Truth आले असेल पण त्यात अनेक समस्या येत असल्याच्या तक्रारी यूजर्स करत आहेत. त्रुटी आढळल्यानंतर, ॲप डाउनलोड करणे थांबविण्यात आले आहे. युजर्सना वेटिंगचे नोटिफिकेशन मिळत आहेत.

ट्रुथ सोशल ॲपचे सीईओ आणि रिपब्लिक पार्टीचे माजी सदस्य डेव्हिन न्युन्स यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, ट्रुथ लवकरच ॲपस्टोअरवर अधिक लोकांसाठी उपलब्ध होईल. ते म्हणाले की या आठवड्यात आम्ही ॲपल स्टोअरवर ॲप अपडेट करू.

donald trump social media app truth social becomes most downloaded app on apple app store
6GB रॅम असलेला देशातील सर्वात स्वस्त फोन; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

ट्रुथ सोशल (Truth social) ॲप काय आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांचे हे ॲप देखील ट्विटरसारखे सोशल मीडिया ॲप आहे. यात ट्विटरसारखे फॉलो बटणही आहे. याशिवाय यात मेसेजिंगचीही सुविधा देँण्यात आली असून ट्विटरमध्ये जसा री-ट्विटचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे ट्रुथमध्ये री-पोस्टचा पर्याय उपलब्ध आहे. ॲपसोबत डार्क मोड देखील मिळतो सोबतच त्यात हॅशटॅगचा ट्रेंडही आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ट्रुथ हे ट्विटरचे क्लोन ॲप आहे.

donald trump social media app truth social becomes most downloaded app on apple app store
OnePlus चा परवडणारा फोन भारतात लॉंच, मिळेल 8GB रॅम अन् बरंच काही

GETTR झालं होतं हॅक

डोनाल्ड ट्रम्पचे माजी वरिष्ठ सल्लागार जेसन मिलर यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये GETTR नावाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च केले, परंतु लॉन्च झाल्यानंतर लगेच GETTR हॅक झाले. GETTR लाँच झाल्याच्या दिवशी 5,00,000 हून अधिक लोकांनी साइन इन केले होते. GETTR देखील Twitter चे क्लोन App आहे. ॲप GETTR वर Google Play-Store आणि Apple च्या App Store वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

donald trump social media app truth social becomes most downloaded app on apple app store
रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.