Karnpura Devi Yatra : कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी ज्येष्ठ भाविकांना 'हेल्प रायडर्स'कडून घरपोच सेवा; असे असेल नियोजन

Register Your Name to Avail This Scheme 'help riders' : नवरात्रोत्सव काळात ही यात्रा असते. यात्रेत रोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी रीघ लावतात.
कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी ज्येष्ठ भाविकांना 'हेल्प रायडर्स'कडून घरपोच सेवा
कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी ज्येष्ठ भाविकांना 'हेल्प रायडर्स'कडून घरपोच सेवाsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याची ग्रामदेवता असलेल्या कर्णपुरा देवी यात्रेला चारशे वर्षांहून जास्त जुनी परंपरा आहे. नवरात्रोत्सव काळात ही यात्रा असते. यात्रेत रोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी रीघ लावतात. यात ज्येष्ठांची परवड होऊ नये, यासाठी ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स सामाजिक संस्थेच्या वतीने याही वर्षी ७० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरून दर्शनासाठी नेले जाईल आणि परत घरी सोडले जाईल. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

ज्यांचे वय सत्तरच्या पुढे आहे, त्यांच्या कुटुंबातील कोणाला वेळ नसल्याने किंवा तब्येतीमुळे कर्णपुरा यात्रेतील देवीच्या दर्शनासाठी जाता येत नाही, असे ज्येष्ठ आजी-आजोबा, दिव्यांग यांनाही हेल्प रायडर्सचे दर्शनदूत म्हणून कर्णपुरा यात्रेत दर्शनासाठी घेऊन जाणार व परत घरी नेऊनही सोडणार आहेत.

या क्रमांकावर करा नोंदणी

ज्येष्ठांनी १ ऑक्टोबरपर्यंत ९६३७१०१६६७, ९९२३३३३५९३, ८६९८५३८८८८, ८८८८८१९०१७, ७७०९७७८९२८, ८००७८९३७९८, ७३५०६६१४२७ या क्रमांकावर नोंदणी करावी. नोंदणी झालेल्या सर्वांना ३ ऑक्टोबरपासून त्यांच्या दर्शनाची वेळ हेल्प रायडर्सतर्फे कळवण्यात येईल. ही सेवा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते अष्टमीपर्यंतच असणार आहे. यात सकाळी ५ ते ८ या वेळेतच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.