Dosa Printer: टेक्नॉलॉजीचा करिष्माच म्हणावा! डोसा बनवण्यासी निघालंय डोसा प्रिंटर

पेपरसारखा आता डोसा प्रिंट होणार, टेक्नॉलॉजीचा करिष्माच म्हणावा
Surprising Dosa Machine Printer
Surprising Dosa Machine Printeresakal
Updated on

टेक्नॉलीजीमुळे जग आज प्रगतीच्या उंच शिखरावर आहे असं म्हणायला हरकत नाही. एग बॉयलर, डिशवॉशर एसे अनेक किचन अप्लायंसेस अनेकांच्या किचनमध्ये उपलब्ध असतात. त्यात भर म्हणून आणखी एक नवं साधन यात आलंय. प्रिटिंग मशिनमध्ये पेपर प्रिंट करताना तुम्ही अनेकदा बघितलंय. पण कधी डोसा प्रिंटरही बाजारात येणार याचा विचार तरी तुम्ही केला होता काय? होय! अनेकांना ही माहिती वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. सोशल मीडियावर एका यूजरने जेव्हा डोसा बनवण्यासाठीच्या एका प्रिंटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता तेव्हा हा व्हिडिओ बघून लोक थक्क झाले होते. (Surprising Dosa Machine Printer)

'इवोशेफ' या एका कंपनीने हे प्रिंटर बनवलं असून त्याला डोसा प्रिंटर असं नाव दिलंय. या प्रिंटरमध्ये ग्राहक त्यांच्या मनाप्रमाणे डोस्याची थिकनेस आणि क्रिस्पीनेस कमी जास्त करू शकतात. ग्राहकांना या मशिनमध्ये फक्त दोस्याचं बॅटर टाकायचं आहे. (Technology) त्यानंतर तुम्हाला हवा तसा जाड, कमी जाड आणि क्रिस्पी डोसा तुमच्यासाठी प्रिंट होऊन रेडी बाहेर पडेल.

या डोसा प्रिंटरचा व्हिडिओ सगळ्यांना चकित करणारा होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आणि या व्हिडिओला मिलियनमध्ये लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आम्हालाही हे डोसा प्रिंटर घ्यायचं आहे असं म्हटलंय. तर अनेकांनी हे प्रिंटर युजलेस असल्याचं म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.