बनावट माहितीच्या आधारे जारी करण्यात आलेले तब्बल ३० हजार सिम कार्ड दूरसंचार विभागाने बंद केले. मुंबईमध्ये ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या दूरसंचार विभागाने (DoT) सिम कार्ड आणि त्यांच्या सबस्क्राईबर्सचा डेटाबेस तपासला. त्यावेळी एकाच फोटोचा वापर करून वेगवेगळ्या नावांनी सिम कार्ड (Fake SIM cards) घेतल्याचे समोर आले. याबाबत आणखी तपास केला असता, असे बरेच ग्रुप असल्याचे दिसून आले. एका ग्रुपमध्ये कमीत कमी ५० असे सबस्क्राईबर दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे अशा एकूण ६२ ग्रुपमध्ये तब्बल ८,२४७ सबस्क्राईबर दिसून आले.
एकाच फोटोने ६८४ सिम
यावेळी एकाच व्यक्तीचा फोटो वापरून वेगवेगळ्या नावने तब्बल ६८४ सिम कार्ड जारी केले असल्याचं दिसून आलं. असाच प्रकार सर्व ६२ ग्रुप्समध्ये दिसून आला. संचार साथी पोर्टलच्या लाँचसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली.
सिम कार्ड विक्री करणाऱ्या अनेक विक्रेत्यांमध्ये फेक सिम जारी करण्याबाबत समन्वय असल्याचं एका अधिकाऱ्याने यावेळी सांगितलं. कित्येक विक्रेते फेक सिम विकणाऱ्यांकडे कानाडोळा करत असल्यामुळे या गोष्टींना वाव मिळत आहे, असंही ते म्हणाले.
दूरसंचार विभाग झालाय हायटेक
बनावट सिम कार्डचा वापर करून कित्येक गुन्हे आणि देशविघातक कृत्ये होतात. सर्व माहिती बनावट असल्यामुळे अशा व्यक्तींचा शोध घेणे सामान्यपणे शक्य होत नाही. यामुळेच दूरसंचार विभाग सुपर कम्प्युटरची मदत घेऊन बनावट सिम कार्डचा शोध घेत आहे. यासाठी ASTR हे टेलिकॉम सिम सबस्क्राईबर व्हेरिफिकेशन सॉफ्टवेअरही तयार करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर एआयच्या मदतीने फेशिअल रिकग्निशन करते. त्यामुळे बनावट सिम कार्ड ओळखणे सोपे झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.