Virus Alert : अँड्रॉईड फोन्सना नवीन मालवेअरचा धोका, खाजगी डेटा होतोय चोरी

dracarys malware found in android Phone  using fake app versions of whatsapp youtube app
dracarys malware found in android Phone using fake app versions of whatsapp youtube app
Updated on

तुम्ही अँड्रॉईड फोन वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सना एका नवीन व्हायरसचा धोका असून मेटाने एका अहवालात या धोक्याबद्दल सावध केले आहे आणि सांगितले आहे की जेव्हा हा व्हायरस तुमच्या नकळत तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतो आणि तुम्हाला लक्षातही येत नाही. वास्तविक हा व्हायरस व्हॉट्सअॅप आणि यूट्यूब सारख्या लोकप्रिय अॅप्सचे बनावट अॅप बनवून अँड्रॉईड फोनवर हल्ला करत आहे.

या व्हायरसची माहिती Meta ने त्यांच्या त्रैमासिक Adversarial Threat Report-2022 मध्ये प्रसिद्ध केली आहे. रिपोर्टनुसार एक नवीन Dracarys मालवेअर सापडला आहे, जो Android अॅपची बनावट आवृत्ती (Fake Version) तयार करून Android डिव्हाइसवर हल्ला करत आहे.

वैयक्तिक डेटा देखील होऊ शकतो चोरी

रिपोर्टनुसार, हा मालवेअर व्हॉट्सअॅप, यूट्यूब, सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या अॅप्सचे बनावट अॅप्स बनवत आहे आणि याद्वारे अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये पसरत आहे. वास्तविक हा मालवेअर परवानगीशिवाय अँड्रॉइड डिव्हाइसवरमध्ये प्रवेश करतो आणि त्याचा सेक्युरिटी अॅक्सेस बायपास करतो. यानंतर, हा मालवेअर अँड्रॉइड डिव्हाइसवरून कॉन्टॅक्ट आणि कॉल डिटेल्स, फाइल्स, एसएमएस टेक्स, लोकेशन आणि फोनचा वैयक्तिक डेटा चोरतो.

dracarys malware found in android Phone  using fake app versions of whatsapp youtube app
Airtel, Jio अन् Vi चे ३६५ दिवसांचे प्लॅन; फ्री डेटासह मिळेल बरंच काही

अशा प्रकारे संरक्षण करा

चिंतेची बाब अशी आहे की, अँटी व्हायरस अॅपद्वारेही ड्रॅकरीस मालवेअर (dracarys malware) पकडले जात नाही. हा मालवेअर अजूनही बाल्यावस्थेत असला तरी सावध राहून तो टाळता येऊ शकतो. जर तुम्ही अँड्रॉइड यूजर असाल तर कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि फोनमध्ये कोणतेही नवीन अॅप डाउनलोड करण्यापूर्वी काळजी घ्या. नवीन अॅप फक्त अधिकृत अॅप स्टोअर किंवा Google Play Store वरून डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा.

dracarys malware found in android Phone  using fake app versions of whatsapp youtube app
येतोय रेडमीचा नवीन स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन; किंमत १२ हजारांहून कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.