DRDO UAV : स्वदेशी हाय-स्पीड फ्लाइंग विंग मानवरहित विमानाची यशस्वी चाचणी; पाहा व्हिडिओ

या अनमॅन्ड एरियल व्हेईकलची (UAV) निर्मिती DRDO च्या एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट विभागाने केली आहे.
DRDO UAV
DRDO UAVeSakal
Updated on

देशाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी (15 डिसेंबर) एका स्वदेशी हाय-स्पीड फ्लाइंग विंग मानवरहित विमानाची (UAV) यशस्वी चाचणी घेतली. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे असणाऱ्या एअरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये ही चाचणी घेण्यात आली. यामुळे अशा प्रकारची विमाने तयार करण्याची क्षमता असणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.

या अनमॅन्ड एरियल व्हेईकलची (UAV) निर्मिती DRDO च्या एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट विभागाने केली आहे. या UAV ला 'ऑटोनॉमस फ्लाईंग विंग टेक्नॉलॉजी डेमन्स्ट्रेटर' असं म्हटलं जात आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीबद्दल डीआरडीओ, सुरक्षा दल आणि इंडस्ट्रीचं अभिनंदन केलं. अशा महत्त्वाच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीमुळे आपला देश आणि सुरक्षा दलं ही आणखी मजबूत होणार आहेत, असं ते म्हणाले.

DRDO UAV
Indian Navy Day : सिंधुदुर्गकरांनी अनुभवली नौदलाची ताकद

या चाचणीमध्ये यूएव्हीचे मजबूत एअरोडायनॅमिक्स आणि कंट्रोल सिस्टीम, इंटिग्रेटेड रिअल टाईम, हार्डवेअर-इन-लूप सिम्युलेशन आणि अत्याधुनिक साऊंड कंट्रोल स्टेशन अशा विविध गोष्टींची यशस्वी चाचणी करण्यात आली. मंत्रालयाने सांगितलं, की या यूएव्हीची पहिली टेस्ट फ्लाईट ही जुलै 2022 मध्ये घेण्यात आली होती. यानंतर विविध कॉन्फिगरेशनच्या सहाय्याने सहा टेस्ट फ्लाईट घेण्यात आल्या. ही सातवी आणि शेवटी टेस्ट फ्लाईट होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.