E-Motorway : इलेक्ट्रिक गाड्यांना सध्या मोठं मार्केट आहे. भारतासह जगभरात इलेक्ट्रिक गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. पण यूरोपमधील स्वीडनने याच्याही पुढचा टप्पा गाठलाय.
या देशात आता जगातील पहिले ई-मोटरवे बनवला जातोय. यामुळे रस्त्यांवरून प्रवास करत असताना गाड्या चार्ज होतील. एका रिपोर्टनुसार, २०४५ पर्यंत स्वीडनमध्ये जवळपास ३ हजार किमी पर्यंतचा इलेक्ट्रिक रस्ता निर्मान करण्याची तयारी केली जात आहे.
यूरो न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, यूरोपिय संघाने गेल्या महिन्यात एक ऐतिहासिक कायदा मंजूर केला आहे. याच्या अंतर्गत २०३५ पासून जी सुद्धा नवीन कारची विक्री केली जाईल. त्याचे CO2 उत्सर्जन शून्य असणे गरजेचे आहे.
स्वीडन आपल्या हायवेला परमानेंट इलेक्ट्रिफाइड रोड मध्ये बदलत आहे. हे जगातील पहिले असणार आहे. इलेक्ट्रिक रोडचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या रोडवरून जात असताना कार ट्रक सह जगातील दुसऱ्या गाड्यांना सुद्धा चार्ज केल्या जाऊ शकतात. याचा हा फायदा होईल की, छोट्या बॅटरी सोबत गाड्या लांबचा प्रवास करू शकतील. चार्जिंग स्टेशनवर चार्जिंग करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही.
इलेक्ट्रिक रस्त्यांच्या दिशेने स्वीडनने अनेक पायलट प्रोजेक्ट सुरू केले आहेत. स्वीडिश ट्रान्सपोर्ट एडमिनिस्ट्रेशनमध्ये स्ट्रॅटिजिक डेव्हलपमेंटचे डायरेक्टर जान पेटर्सन ने यूरोन्यूजशी बोलताना सांगितले की, ट्रान्सपोर्ट सेक्टरला डीकार्बोनाइज करण्याच्या दिशेने रस्त्याचे विद्युतीकरण एक चांगली पद्धत होऊ शकते. सध्या ज्या मोटरवेला इलेक्ट्रिक बनवण्याची तयारी आहे. ते देशातील ३ प्रमुख शहरे स्टॉकहोम, गोथेनबर्ग आणि माल्मो दरम्यान स्थित हॉल्सबर्ग आणि ऑरेब्रो या दरम्यान लॉजिस्टिक हबला जोडते.
हे प्रोजेक्ट सध्या प्राथमिक स्तरावर आहे. हे २०२५ पर्यंत बनवण्याची योजना आहे. गाड्या कशा पद्धतीने चार्ज होणार, हे अद्याप स्पष्ट नाही. रिपोर्टच्या माहितीनुसार, चार्जिंग सिस्टम वापरात आणल्या जाऊ शकतात. स्वीडन आपल्या प्रयत्नात जर यशस्वी झाले तर भविष्यात अनेक देश इलेक्ट्रिक रस्ते तयार करू शकतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.