तुमची कार शेअर करून कमवा पैसे!

Zoomcar vehicle hosting Program: देशांतर्गत कार-शेअरिंग मार्केटप्लेस झूमकारने गुरुवारी आपला वाहन होस्ट कार्यक्रम जाहीर केला.
Zoomcar vehicle hosting Program
Zoomcar vehicle hosting ProgramEsakal
Updated on

Zoomcar Vehicle Host Program: देशांतर्गत कार-शेअरिंग मार्केटप्लेस झूमकारने (zoomcar) आपला वाहन होस्ट कार्यक्रम जाहीर केला. त्या अंतर्गत वाहन मालक त्यांची वैयक्तिक कार कंपनीच्या या प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकतात. त्यामुळे वाहन मालकांना काय फायदा होणार आहे आणि झूमकार किती शहरांमध्ये ही सुविधा सुरू करत आहे, हे जाणून घेऊया.

एका वर्षात 100 शहरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य (Aim to reach 100 cities in a year)-

सध्या झूमकारच्या 8 शहरांमध्ये 5,000 हून अधिक कार आहेत. कंपनीला पुढील 12 महिन्यांत 50,000 कार आणि 100 शहरांमध्ये प्लॅटफॉर्म वाढवण्याची अपेक्षा आहे.

Zoomcar vehicle hosting Program
एक लिटर पेट्रोलमध्ये धावतात 26 किमी; पाहा देशातील टॉप मायलेज कार

झूमकारचे सीईओ आणि सह-संस्थापक ग्रेग मोरन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “जगभरातील उच्च-विकसित शहरांमध्ये कार प्रवेश सुलभ करणे हे झुमकारचं ध्येय आहे. येणाऱ्या काळात भारत आमची सर्वात मोठी बाजारपेठ राहील आणि आमचा नवीन होस्ट कार्यक्रम हा भारतातील सर्व आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असून त्यामाध्यमातून आम्ही शहरांची गतिमानतेसाठी वचनबद्ध आहोत.”

Zoomacar मधून पैसे कसे कमवायचे (Earn thruogh Zoomcar)-

या कार्यक्रमांतर्गत आता कार मालक त्यांच्या सोयीनुसार झूमकारद्वारे त्यांची कार शेअर करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही आठवडाभर कुठेही जात नसाल आणि तुमची कार घरी उभी असेल, तर या काळात तुम्ही तुमची कार Zoomcar वर शेअर करून पैसे कमवू शकता. सर्वात चांगला भाग म्हणजे झूमकार कमावलेले पैसे थेट वाहन मालकाच्या बँक खात्यात रिअल-टाइम आधारावर जमा करते.

Zoomcar vehicle hosting Program
स्वस्तात मस्त बेस्ट फॅमिली कार; किंमत 5 लाखांपेक्षा कमी

10 हजार जॉइनिंग बोनस (10000 Rs Joining Bonus)-

झूमकार वैयक्तिक मालकाची आर्थिक बाजू लक्षात घेऊन अतिरिक्त सुविधा देखील देत आहे. उदाहरणार्थ, वैयक्तिक वाहन मालकांना रु. 10,000 चा जॉइनिंग बोनस आणि प्लॅटफॉर्मवरील उच्च दर्जाच्या होस्ट रेटिंगसह इंसेटिव्ह दिला जाईल.

झूमकार या भारतातील अग्रगण्य कार शेअरिंग प्लॅटफॉर्म, अलीकडेच आग्नेय आशिया आणि मेना क्षेत्रामध्ये विस्तारित होऊन जागतिक कार शेअरिंग प्लॅटफॉर्म बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.