ही स्पीड टेस्ट चालवण्यासाठी गुगलने मेजरमेंट लॅब (M लॅब) सोबत पार्टनरशिप केलेली आहे.
कधी कधी इंटरनेट कनेक्शन (Internet Connection) कमी-जास्त होत असताना आपण पहिल्यांदा स्पीड टेस्ट चेक करतो. इंटरनेट स्पीड टेस्ट (Internet speed test) त्यावेळी तुमच्या डिव्हाइसला मिळणारा डाऊनलोड आणि अपलोड स्पीड दाखवते. टेस्टिंग आपल्याला विलंब मोजण्यास देखील मदत करते. तर अशा अनेक वेबसाइट्स आणि अॅप्स आहेत, ज्या तुम्हाला ही टेस्ट करण्यास मदत करतात. गुगलने (Google) ऑफर केलेली वेबसाइट सर्वात सोपी अॅक्सेसपैकी एक आहे.
ही स्पीड टेस्ट चालवण्यासाठी गुगलने मेजरमेंट लॅब (M लॅब) सोबत पार्टनरशिप केलेली आहे. ही टेस्ट चालविणे आपल्या कनेक्शनच्या स्पीडवर अवलंबून 40MB पेक्षा जास्त डेटा ट्रान्सफर करू शकते. तसेच मोबाइल डेटा चार्ज लागू होऊ शकतात. टेस्टिंग चालविण्यासाठी, तुम्ही M-लॅबशी जोडलेले रहाल आणि तुमचा आयपी पत्ता त्यांच्याबरोबर शेअर केला जाईल आणि त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार त्यांच्याद्वारे प्रक्रिया केली जाईल.
Google.com स्पीड टेस्ट कशी चालवायची हे जाणून घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करू शकता.
- तुमच्या स्मार्टफोन, PC किंवा टॅबलेटवर कोणत्याही इंटरनेट ब्राउजरवर Google.com ओपन करा.
- सर्च बारचा वापर करून 'Run Speed Test'चा सर्च करा.
- सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला 'Internet Speed Test' डायलॉग बॉक्स दिसेल.डायलॉग बॉक्समध्ये लिहिले आहे की, "30 सेकंदांपेक्षा कमी वेळात आपला इंटरनेट स्पीड तपासा. स्पीड टेस्ट सहसा 40 एमबीपेक्षा कमी डेटा ट्रान्सफर करते, परंतु फास्ट कनेक्शनवर अधिक डेटा ट्रान्सफर करू शकते."
- बॉक्सच्या अगदी खाली रन स्पीड टेस्ट बटणावर क्लिक करा.
- तुम्ही एकदा बटण दाबल्यानंतर, तुम्हाला एक पॉप-अप दिसू शकेल जिथे Google तुम्हाला रिझल्ट दाखवेल.
- हे लक्षात घेण्यासारखे आहे की एम-लॅब टेस्टिंग घेते आणि इंटरनेट संशोधनास चालना देण्यासाठी सर्व टेस्ट रिझल्ट सार्वजनिकपणे प्रकाशित करते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.