ED Raids : हीरो मोटोकॉर्प कंपनीचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन पवन मुंजाळ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. हीरो ही जगातील एक अग्रगण्य दुचाकी निर्मिती करणारी कंपनी आहे.
अंमलबजावणी संचलनालयाने (ED) आज सकाळी ही कारवाई केली. पवन मुंजाळ यांच्यासह कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांवर देखील छापे मारण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) एका प्रकरणाची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ईडीने हीरो मोटोकॉर्पच्या दिल्ली आणि शेजारील गुरुग्राम येथील कार्यालयांची झडती घेतली. यासोबतच मुंजाळ यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली. (ED Raids)
डीआरआयने काही दिवसांपूर्वीच अघोषित परदेशी चलन बाळगल्याप्रकरणी पवन मुंजाळ यांच्या एका निकटवर्तीयाला ताब्यात घेतलं होतं. यानंतर कॉर्पोरेट विषयांसंबंधी असणाऱ्या मंत्रालयाने हीरो कंपनीविरोधात तपास सुरू केला होता.
हीरो ही जगभरातील सर्वात मोठी दुचाकी बनवणारी कंपनी आहे. सर्वाधिक दुचाकी विकण्याच्या बाबतीत गेल्या 20 वर्षांपासून ही कंपनी अव्वल स्थान टिकवून आहे. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील सुमारे 40 देशांमध्ये हीरोच्या गाड्यांची विक्री होते.
मुंजाळ यांच्या घरी छापेमारी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मार्च महिन्यात देखील करचोरी प्रकरणात मुंजाळ आणि हीरोच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने छापे मारले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.