Twitter Edit Feature : युजर्ससाठी मोठी बातमी, आता ट्विट होणार एडिट!

edit button on twitter Twitter Edit Feature you can edit your tweet
edit button on twitter Twitter Edit Feature you can edit your tweet
Updated on

Twitter Edit Feature : ट्विटरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम सारखे ट्विट केल्यानंतर ते देखील संपादीत करताय येणार आहे. यासाठी ट्विटरने एडिट बटण सुरू केले आहे! मात्र, सुरुवातीला फक्त व्हेरिफाईड अकाउंटनाच ही सुविधा मिळेल. अनेक दिवसांपासून यूजर्स ट्विट एडिट बटणची मागणी करत होते. टेस्लाच्या सीईओने इलॉन मस्क यांच्या ट्विटद्वारे संपादन बटण सुरू करण्याची मागणी केली होती.

30 मिनिटांपर्यंत करता येणार एडिट

ट्विट केल्यानंतर 30 मिनिटांपर्यत ट्विट एडिट करता येणार असून, ट्विटरने सध्या याची चाचणी सुरू केली आहे. ट्विटरने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे, यामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवर एडिट ट्विट बटण दिसतंय कारण आम्ही त्याची चाचणी घेतोय असे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला ज्यांचे अकाउंट व्हेरिफाईड आहे त्यांनाच ही सुविधा मिळणार आहे. लवकरच एडिट ट्विट बटण मिळणार असल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.

जर तुम्ही ट्विट केले असेल आणि तुम्हाला ते बदलायचे असेल तर ते बदलण्याचा पर्याय असेल. पण त्याची संपूर्ण हिस्ट्री त्यामध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजेच पहिल्या ट्विटपासून बदललेल्या ट्विटपर्यंत. भारतात ही सुविधा कधी उपलब्ध होईल हे सांगणे कठीण आहे, पण ज्यांचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड आहे त्यांना ही सुविधा मिळणार हे नक्की. यासोबतच तुमचे ट्विट कोणी पाहत असेल तर त्याला समजेल की ट्विट एडिट केलेले आहे.

edit button on twitter Twitter Edit Feature you can edit your tweet
मोठ्या प्रतीक्षेनंतर Sony चा नवा स्मार्टफोन लॉंच; मिळतो दमदार कॅमेरा, डिस्प्ले

याचा अर्थ असा नाही की तुम्ही आधी काहीही ट्विट कराल आणि नंतर संपादित करु शकाल, हे अजिबात होणार नाही. कारण मूळ ट्विटमध्ये काय बदल झाला आहे हेही यूजर्स पाहू शकतील. Twitter चे 320 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. एडिट बटणासाठी ट्विटर युजर्स अनेक दिवसांपासून मागणी करत होते. कदाचित पुढील एक-दोन दिवसांत तुम्हाला हा ऑप्शन देण्यात येईल.

edit button on twitter Twitter Edit Feature you can edit your tweet
Online Scam : LinkdIn युजर्स ठरत आहेत स्कॅमर्सचे बळी; असा करा बचाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.