Electric Bikes : आजपासून इलेक्ट्रिक बाइक्सच्या किंमती वाढल्या; मोदी सरकारच्या 'या' निर्णयाचा फटका

एथर ४५०एक्स या ई-बाईकच्या किंमतीत तब्बल ३२,५०० रुपयांची वाढ झाली आहे.
EV subsidy reduced
EV subsidy reducedEsakal
Updated on

सध्या इलेक्ट्रिक बाईक्सची लोकप्रियता वाढली आहे. पेट्रोलच्या तुलनेत अगदी कमी खर्च, आणि पर्यावरणाचाही फायदा यामुळे बरेच लोक ईव्हीचा पर्याय स्वीकारत आहेत. तुम्हीदेखील जर इलेक्ट्रिक बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या एका निर्णयामुळे आता इलेक्ट्रिक दुचाकी घेणं महागणार आहे.

केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात घट केली आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनावर केवळ १० हजार रुपये प्रति किलोवॅट एवढे अनुदान मिळणार आहे. यापूर्वी ही रक्कम १५ हजार रुपये होती. फेम-२ साठी असलेल्या दुचाकींबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. १९ मे रोजी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती.

EV subsidy reduced
Royal Enfield Electric Bike : लवकरच येणार 'इलेक्ट्रिक बुलेट'; रॉयल एनफिल्डच्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

२५-३५ हजारांचा तोटा

या निर्णयाचा थेट परिणाम इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीवर होणार आहे. अनुदानात कपात केल्यामुळे दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्या वाहनांचे फीचर्स आणि बॅटरी पॅकमध्ये कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतात. यामुळे वाहनांच्या किंमती सुमारे २५ ते ३५ हजारांनी वाढू शकतात.

EV subsidy reduced
New Rules From 1 June: गृहकर्जापासून ते विम्याच्या हप्त्यापर्यंत, आजपासून बदलणार 'हे' नियम, खिशावर होणार परिणाम

एथर-ओला महागल्या

या निर्णयानंतर एथर ४५०एक्स या ई-बाईकच्या किंमतीत तब्बल ३२,५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर, ओलाच्या एस१ या मॉडेलच्या किंमतीत १५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या बाईकची किंमत आता १,२९,९९९ एवढी असणार आहे. मॅटर एनर्जी या कंपनीच्या एरा नावाच्या दुचाकीच्या किंमतीत देखील ३० हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे या बाईकची किंमत दीड लाखांच्या वर गेली आहे.

EV subsidy reduced
E-Luna : नवी पिढीही म्हणणार 'चल मेरी लूना'; इलेक्ट्रिक स्वरुपात परत येतेय प्रसिद्ध मोपेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.