Should you buy electric car: आजकाल सर्व कार कंपन्या आपल्या ग्राहकांना अनेक ऑफर्स देत आहेत. त्यामूळे इलेक्ट्रिक कारच्या पसंतीत वाढ झाली आहे. असे होण्याचे दुसरे कारण म्हणजे डिझेल-पेट्रोलच्या चढत्या किमती आणि प्रदूषणाची वाढती पातळी होय.
ग्राहकांना आजवर केवळ पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी असेच पर्याय उपलब्ध होते. पण, आता त्यात इलेक्ट्रिक कारचीही भर पडली आहे. पण अद्याप या गाडीबद्दल फारशी माहिती नसल्याने लोकं ती घेऊया की नको, अशा संभ्रमात पडले आहेत.
डिझेल-पेट्रोल कार घेण्याऐवजी इलेक्ट्रिक कार घ्यायची का, असा प्रश्न लोकांना पडतो. इलेक्ट्रिक कार दीर्घकाळात फायदेशीर ठरेल की आपले नुकसानच करेल. त्याबद्दल जाणून घेऊया.
इलेक्ट्रिक कार्सबद्दल बोलायचे झाले तर, भारतामध्ये अशा कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत, ज्यात सुधारणा करण्यासाठी सरकार सतत काम करत आहे. 2025-26 पर्यंत इलेक्ट्रिक पॅसेंजर कारमध्ये 12 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये, इलेक्ट्रिक कारची मागणी वार्षिक आधारावर 109 टक्क्यांनी वाढली होती, जी 2020 पर्यंत 361.78 टक्क्यांपर्यंत वाढली होती.
इलेक्ट्रिक कार विकत घेताना तुम्हाला नक्कीच वाटेल की ज्या रकमेमध्ये तुम्हाला एक छोटी इलेक्ट्रिक कार मिळत आहे. त्याच पैशात तुम्ही मोठी पेट्रोल-डिझेल कार घेऊ शकता. येथे सर्वात मोठा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की तुम्हाला मोठ्या कारची गरज आहे का? याच प्रश्नांची उत्तरे तूम्हाला आज मिळतील.
इलेक्ट्रिक कारचे फायदे
रनिंग कॉस्ट -
सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा रनिंग कॉस्ट खूप कमी असेल. जर तुम्ही दिल्लीत असाल आणि दिवसाला सुमारे 30 किलोमीटर गाडी चालवत असाल तर तुमचा महिन्याचा पेट्रोलचा खर्च 5,375 रुपये होईल. जर तूम्ही 30.2 kWh बॅटरी असलेली कार चालवत असाल तर ती 312 किमी मायलेज देते. घरी बॅटरी चार्ज करण्यासाठी तुम्हाला दरमहा सुमारे 697 रुपये खर्च येईल.
तुम्ही सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर बॅटरी चार्ज केली तर तुम्हाला दरमहा केवळ 392 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच जर तुमची कार पेट्रोलवर सुमारे 17 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देत असेल. तर तुमचा प्रति किलोमीटर खर्च सुमारे 5.97 रुपये असेल. आणि इलेक्ट्रिक वाहनाच्या बाबतीत तुम्हाला प्रति किलोमीटर फक्त 0.43 रुपये मोजावे लागतील.
मेंटनन्स खर्च -
इलेक्ट्रिक कारचा आणखी एक फायदा म्हणजे, गाडीच्या सर्व्हिसिंगवर फारच कमी खर्च येतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनात हलणारे भाग फार कमी असतात. त्यामूळे इंजिनमधील सर्व प्रकारच्या तेलावर होणारा खर्च बराच कमी होतो. टाटाच्या इलेक्ट्रिक कारची किंमत 5 वर्षांत 25,000 रुपयांपर्यंत आहे. तर डिझेल-पेट्रोल कारसाठी तुम्हाला वार्षिक 8-10,000 रुपये मोजावे लागतील.
पर्यावरणासाठी फायदेशीर -
इलेक्ट्रिक कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामुळे प्रदूषण अजिबात होत नाही. दुसरीकडे डिझेल-पेट्रोलची वाहने जेवढी जास्त धावतात तेवढे प्रदूषणही होते. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की वीज निर्मितीसाठी कोळसा इत्यादींचा वापर सर्व यंत्रांमध्ये केला जातो. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, डिझेल-पेट्रोल कारशी तुलना केल्यास इलेक्ट्रिक कारमुळे प्रदूषण कमी होते.
चांगला परफॉर्मन्स देते -
एका वेबसाइटनुसार, इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीमधून सुमारे 59-62 टक्के ऊर्जा वाहनाच्या मूवमेंटमध्ये वापरली जाते. तर पेट्रोल कारमध्ये हे प्रमाण केवळ 17-21 टक्के आहे. या बाबतीत इलेक्ट्रिक कार खूप चांगल्या आहेत.
या गाड्यांमधील इंजिनमधून फार मोठा आवाज येत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही खूप शांततेने कार चालवू शकता. त्याच वेळी, इलेक्ट्रिक कारचे पिकअप देखील डिझेल-पेट्रोल वाहनांपेक्षा चांगले आहे.
करामध्ये सूट
वर्ष 2020-21 पासून कलम 80EEB अंतर्गत, तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनाच्या कर्जावर भरलेल्या व्याजावर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट दिली जात आहे. यासाठी तुमचे कर्ज १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान मंजूर झालेले असावे. 2021 च्या अर्थसंकल्पानुसार, 15 वर्षांनंतर प्रत्येक कारवर ग्रीन टॅक्स लागू केला जाईल. स्विच दिल्ली योजनेअंतर्गत, सुरुवातीच्या 1000 कारवर 10,000 रुपये प्रति किलोवॅट सबसिडी दिली जात आहे, जी कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
इलेक्ट्रिक कारचे तोटे
चार्जिंगसाठी अधिक वेटींग
सरकार आणि खासगी कंपन्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्याचा विचार करीत आहे. मात्र, चार्जिंग स्टेशनची उभारणी करणं मोठं आव्हानात्म काम आहे. सर्वसाधारणपणे वाहनांत इंधन भरण्यासाठी कमी कालावधी लागतो. रांगा अधिक नसल्यास 2-3 मिनिटांत पेट्रोल किंवा डिझेल भरू शकतात.
इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केल्यास कारच्या चार्जिंगासाठी तुलनेने अधिक वेळ लागतो. सध्या आधुनिक तंत्राचा अवलंब केलेली वाहनं बाजारात आहेत. त्यामध्ये कमी वेळात तत्काळ चार्जिंग होऊ शकते. नुकतीच लाँच झालेली व्हॉल्वो 40 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेच इलेक्ट्रिक कारसाठी अद्यापही 40 मिनिटे लागतात.
महागडा बॅटरी पॅक -
इलेक्ट्रिक कारमध्ये बॅटरी पॅक सर्वात महागडा पार्ट असतो. बॅटरी पॅक नादुरुस्त झाल्यास बदलावयाच्या असल्यास लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.
कारची रेंज -
पेट्रोल कारची टाकी फुल्ल केल्यानंतर 400-500 किलोमीटरचं अंतर सहज कापू शकतो. आतापर्यंत आलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये रेंजची समस्या आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही बाबत 400 किलोमीटरचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षाहून कारची रेंज निश्चितच कमी आहे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात तुम्हाला निश्चितच इलेक्ट्रिक कार खरेदीबाबत विचार करायलाच हवा.
वाहन विमा महाग -
डिझेल-पेट्रोल कार विम्यापेक्षा इलेक्ट्रिक वाहन विमा देखील महाग आहे. याचे कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहने खूप महाग असतात कारण ते उच्च तंत्रज्ञान आणि उच्च क्षमतेच्या बॅटरी वापरतात. डिझेल-पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारचे पार्ट कमी असतात, पण जास्त महाग असतात. त्याच वेळी, या कारच्या बॅटरी देखील खूप महाग आहेत.
इलेक्ट्रिक कार खरेदी करावी का?
जर तूम्ही पर्यावरणाबद्दल जागरूक असाल तर, तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू शकता. तुम्हाला इलेक्ट्रिक कारवर आता जास्त खर्च करावा. लागणार असला तरी, येत्या काही वर्षांत, कमी रनिंग कॉस्ट आणि कमी देखभाल खर्चामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. दुसरीकडे, जर तुम्ही मेट्रो शहरात असाल जिथे चार्जिंग स्टेशन्स आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.