Electronic Bullet Bike Launch : रॉयल एनफिल्डच्या नव्या बाइकची वाट पाहताय? लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. रॉयल एनफिल्डने त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणण्याची तयारी केली आहे. इंस्टाग्रामवर नुकताच या बाइकचा टीझर शेअर करण्यात आला आहे, ज्यामुळे बाइकप्रेमींमध्ये खूपच उत्सुकता आहे. भारतात 250 ते 750 सीसी बाइक्ससाठी ओळखली जाणारी रॉयल एनफिल्ड आता इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही पाऊल टाकणार आहे.
रॉयल एनफिल्डच्या या पहिल्या इलेक्ट्रिक बाइकचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही, मात्र ती इटलीत होणाऱ्या EICMA 2024 या मोटर शोमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ही बाइक आपल्या रेट्रो स्टाईलसाठी ओळखली जाईल, जी रॉयल एनफिल्डच्या (electronic bullet bike) जुन्या गाड्यांसारखीच क्लासिक लुक देईल. हेडलॅम्प, इंडिकेटर, आणि फेंडर यांसारख्या वैशिष्ट्यांसह सिंगल सीट सेटअप बाइकला अधिक आकर्षक बनवेल.
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक बाइकला Electrik01 असं कोडनेम देण्यात आलं आहे. ही बाइक कंपनीच्या नवीन ‘L प्लॅटफॉर्म’वर आधारित असेल. याशिवाय, रॉयल एनफिल्ड त्याच प्लॅटफॉर्मवर ॲडव्हेंचर टूरर बाइक विकसित करत आहे, जी हिमालयन इलेक्ट्रिक नावाने लाँच केली जाऊ शकते. (Electric Royal Enfield) त्यामुळे आता फक्त इलेक्ट्रिक बाइकच नाही, तर इलेक्ट्रिक ॲडव्हेंचर बाईक्ससुद्धा बाजारात येणार आहेत.
रॉयल एनफिल्डची ही बाइक एक अनोखा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. सिंगल सीट, अलॉय व्हील, गोल मिरर आणि पातळ टायर्ससह या बाइकचा लूक अगदी परिपूर्ण असणार आहे.
रेट्रो स्टाइल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या या बाइककडे ग्राहकांची ओढ वाढण्याची शक्यता आहे. रॉयल एनफिल्डने भारतीय बाजारपेठेत बऱ्याच काळापासून आपली पकड कायम ठेवली आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात या ब्रँडची प्रवास कसा असेल, याची उत्सुकता वाढली आहे. तर, बाइकप्रेमींनो, तुमचे पैसे तयार ठेवा, कारण रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक तुमच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.