Hero MotoCorp launch Vida V1 Plus : हिरो मोटोकॉर्पने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर अपडेट करून नव्याने लाँच केले आहे. अपडेट केल्यानंतर कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत देखील घट केली आहे. हिरोने Vida V1 Plus स्कूटर अपडेट करत भारतात लाँच करण्यात केलं आहे. Vida V1 Plus ची किंमत हीरोच्या बाकी मॉडल्सच्या तुलनेत ३० हजारांहून कमी करम्यात आली आहे. किमतीत कपात जरी झाली असली तरी स्कूटरच्या फीचर्स आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हिरो मोटोकॉर्पने लाँच केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरुम प्राइस १.१५ लाख रुपये आहे. याआधी Vida V1 Pro मॉडल लॉन्च करण्यात आलं होतं. त्याच्या तुलनेत Vida V1 Plus ची किंमत ३० हजारापर्यंत कमी करण्यात आली आहे. विडा व्ही १ प्लस, विडा व्ही१ प्रोचे अपडेटेड मॉडल आहे.
जानेवारी २०२४ मध्ये सेल किती झाला?
मागील वर्षी जानेवारी २०२३ च्या तुलनेत जानेवारी २०२४ मध्ये हीरोच्या इलेक्ट्रि स्कूटर्सची विक्री ६.४६ टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. आता कंपनीने विडा व्ही१ प्रोला अपडेट करून विडा व्ही१ प्लस लाँच केलं. तसेच विडा व्ही१ प्रोच्या तुलवेत विडा व्ही१ प्लसची किंमत ३० हजारांनी कमी करण्यात आली आहे. हीरो मोटोकॉर्पच्या जानेवारी २०२४ मझ्ये टू-व्हीलर इलेक्ट्रिक वाहनांचे १४९४ यूनिट्सची विक्री झाली आहे. तसेच मागिल वर्षी २०२३ च्या जानेवारी महिन्यात ६.४६ टक्के जास्त इलेक्ट्रि स्कूटर विक्री झाली होती.
सप्टेंबर २०२३ मध्ये हिरोने रेकॉर्ड विक्री केली होती. हिरोने पहिल्यादाच एका महिन्यात तीन हजार यूनिट्सची विक्री केली होती. हिरोने विडा व्ही१ प्लसच्या किंमती कमी करून लोकांच्या बजेटनुसार इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लाँच केली आहे.
Vida V1 Plus फीचर्स काय आहेत?
Vida V1 Plus आणि Vida V1 Pro या दोन्हींमध्ये 6kW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतं. LED लाइटिंग आणि मल्टीपल राइड मोड देखील मिळतात. Vida V1 Plus मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी ऑप्शनसुद्धा दिला गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.