इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून 'एक्स' (ट्विटर) मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. अगदी याचं नाव, लोगो आणि कित्येक फीचर्समध्ये बदल करण्यात आले आहेत. यातच आता एक्सवरील एक मोठं फीचर हटवण्याच्या तयारीत मस्क आहे.
एका एक्स पोस्टला रिप्लाय देताना इलॉन मस्कने याबाबत माहिती दिली. ब्लॉक हा पर्याय एक फीचर म्हणून हटवण्यात येणार आहे. केवळ डीएम (डायरेक्ट मेसेज) मध्ये ब्लॉकचा ऑप्शन उपलब्ध असेल; असं मस्कने स्पष्ट केलं.
ब्लॉकचा पर्याय हटला, तरीही एक्स यूजर्स इतरांना म्यूट नक्कीच करू शकतील. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करता, तेव्हा त्या व्यक्तीशी तुमचा संपर्क पूर्णपणे बंद होतो. ते तुम्हाला मेसेज करु शकत नाहीत, किंवा त्यांना तुमच्या पोस्टही दिसत नाहीत.
मात्र, जेव्हा तुम्ही एखाद्या यूजरला म्यूट करता, तेव्हा त्या व्यक्तीने केलेल्या पोस्ट तुमच्या फीडमध्ये दिसणं बंद होतं. सोबतच, त्या व्यक्तीलाही तुमच्या पोस्ट आपल्या फीडमध्ये दिसत नाहीत. अर्थात, तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर जाऊन त्याच्या पोस्ट पाहू शकता.
मस्कच्या या घोषणेनंतर एक्स यूजर्सनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या स्पॅम मेसेजेसचं किंवा ट्रोलिंगचं प्रमाण वाढल्यामुळे ब्लॉक हा पर्याय अगदी गरजेचा असल्याचं काही यूजर्स म्हणत आहेत. तर, ब्लॉक हा पर्याय सुरक्षिततेची खोटी जाणीव करुन देतो, त्यामुळे तो नसलेलाच बरा असंही काही यूजर्स म्हणत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.