Elon Musk Shares Kamala Harris Deepfake Video Contoversy
Elon Musk Shares Kamala Harris Deepfake Video Contoversyesakal

Elon Musk Deepfake Controversy: उपराष्ट्रपतींचा डीपफेक व्हिडिओ शेअरकरून इलॉन मस्क पुन्हा अडकले वादाच्या भोवऱ्यात,नेमकं प्रकरण काय?

Kamala Harris Deepfake Video Goes Viral: जागतिक स्तरावर चर्चेत असलेले टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केल्याने ही खळबळ उडाली आहे.
Published on

Elon Musk Deepfake Video Contoversy : जागतिक स्तरावर चर्चेत असलेले टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केल्याने ही खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार करण्यात आला असून, त्यात हॅरिस यांच्या आवाजाला एडिट करून त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये हॅरिस यांना अपमानित करण्यात आले असून, त्यांना "डायव्हर्सिटी हायर" आणि "डीप स्टेट पपेट" अशी टिपणी केली आहे.

कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजम यांचा विरोध

या व्हिडिओच्या निषेधार्थ कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजम यांनी ट्विट केले. यावर प्रत्युत्तर देताना मस्क यांनी पॅरोडी कायदेशीर असल्याचे म्हणत आपला बचाव केला. तसेच, त्यांनी आणखी काही ट्विट्समध्ये या विषयावर आपले मत व्यक्त केले.

X चे धोरण उल्लंघन?

मूळतः हा व्हिडिओ @MrReaganUSA यांनी पोस्ट केला होता. मस्क यांनी हा व्हिडिओ पुनः पोस्ट करताना त्यात कोणतेही बदल झाले असल्याचे नमूद केले नाही. X चे सिंथेटिक आणि मॅनिप्युलेटेड मीडियाच्या धोरणानुसार चुकीची आणि दिशाभूल करणारी माध्यमे शेअर करणे प्रतिबंधित आहे. मस्क यांच्या या कृतीमुळे X चे धोरण उल्लंघन झाले असावे, असा आरोप होत आहे.

Elon Musk Shares Kamala Harris Deepfake Video Contoversy
Satellite Internet : आकाशातून उतरले इलॉन मस्कचे ‘सुपर फास्ट’ इंटरनेट! सिमकार्डविना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मिळणार इंटरनेट

डीपफेक तंत्रज्ञानाचा धोका

डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओमध्ये बदल करणे आता सोपे झाले आहे. यामुळे चुकीची माहिती पसरवण्याचा धोका वाढला आहे. अनेक राजकारण्यांना या तंत्रज्ञानामुळे नुकसान सहन करावे लागले आहे.

Elon Musk Shares Kamala Harris Deepfake Video Contoversy
Elon Musk EVM : इलॉन मस्क विरुद्ध भारतीय EVM; भाजपा नेत्यानं दिलं सडेतोड प्रत्युत्तर,जाणून घ्या काय आहे प्रकरण

एलॉन मस्क यांनी कमला हॅरिस यांचा डीपफेक व्हिडिओ शेअर करून मोठा वाद निर्माण केला आहे. यामुळे डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याच्या धोक्याकडे लक्ष वेधले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.