Elon Musk Homework : इलॉन मस्कच्या फिज़िक्स गृहपाठाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, तुम्ही पाहिले काय?

Elon Musk Shares College Physics Homework Details : टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या कॉलेज जीवनातील फिजिक्सच्या होमवर्कचे हस्तलिखित पानं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Elon Musk Shares College Physics Homework Details
Elon Musk Shares College Physics Homework Detailsesakal
Updated on

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या कॉलेज जीवनातील फिजिक्सच्या होमवर्कचे हस्तलिखित पानं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मस्क यांनी अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना लिहिलेल्या या पानांवर अवघड गणना आणि समीकरणे दिसतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर डिमा झेनिउक यांनी ही चित्रे पोस्ट केली असून, मस्क यांनी यावर प्रतिक्रिया देत या होमवर्कची पुष्टी केली आहे.

या होमवर्कमध्ये मस्क यांनी "मॉमेंट ऑफ इनर्शिया" किंवा जडत्व क्षणांची गणना करण्याचे अवघड काम हाती घेतले होते. फिजिक्सच्या या संकल्पनेत वस्तूंच्या फिरत्या गतीवर आधारित अवघड गणना आवश्यक असते. मस्क यांनी हे हस्तलिखित स्वतःचेच असल्याची खात्री दिली असली, तरी मूळ पानांपैकी काही गायब असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

Elon Musk Shares College Physics Homework Details
X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

चाहत्यांचा उत्साह आणि कौतुक

हे पान सोशल मीडियावर पोस्ट झाल्यापासून जवळपास 60,000 लोकांनी पाहिले असून चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. एकाने या गणिताची प्रशंसा करत “इनर्शिया टेन्सरची गणना दिसते आहे” असं लिहिलं. दुसर्‍याने तर "मला हे फ्रेम करायला आवडेल... हे पाहून आनंद वाटतो," अशी भावना व्यक्त केली. काही जणांना या हस्तलिखिताची उत्पत्तीबद्दल कुतूहल वाटले. "एलन मस्क यांनी आपली नोट्स जपून ठेवल्यात हे आश्चर्यकारक आहे," असं एकाने लिहिलं.

Elon Musk Shares College Physics Homework Details
Jio Recharge Plans : जिओने लाँच केला भन्नाट रिचार्ज प्लॅन; दिवसाला १० रुपये खर्चात मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन् बरंच काही

मस्कच्या कॉलेजच्या काळातील या होमवर्कवरून त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि परिश्रमाची बीजे कशी रुजली हे चाहत्यांना दिसून येत आहे. त्यांच्या तरुण वयातील या गणना पाहून अनेकांना प्रेरणा मिळत आहे, तर काहींनी “यातून त्यांचा यशाचा प्रवास स्पष्ट दिसतो” अशी प्रतिक्रिया दिली.

मस्क यांचे हे हस्तलिखित पानं पाहून अनेकांना त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्याची संधी मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.