Elon Musk Mars Mission : इलॉन मस्क 10 लाख लोकांना नेणार मंगळ ग्रहावर; सांगितला मार्स मिशनचा नवा गेम प्लॅन!

SpaceX Starship : स्पेस एक्स या अंतराळ संशोधन संस्थेने आतापर्यंतचं सर्वात मोठं रॉकेट तयार केलं आहे.
Elon Musk Mars Mission
Elon Musk Mars MissioneSakal
Updated on

Elon Musk Game Plan for Mars : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क हे नेहमीच विविध प्रकारच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मस्क यांच्या मंगळ मोहिमेची चर्चा तर गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत आता मस्कने आपला नवा गेमप्लॅन सांगितला आहे.

एका एक्स पोस्टच्या रिप्लायमध्ये मस्कने याबाबत माहिती दिली आहे. आपण दहा लाख लोकांना मंगळावर नेणार असल्याचं मस्कने सांगितलंय. अर्थात, हे कधी शक्य होईल याबाबत मस्कने कोणताही उल्लेख केलेला नाही.

आतापर्यंतचं सगळ्यात मोठं रॉकेट

स्पेस एक्स या अंतराळ संशोधन संस्थेने आतापर्यंतचं सर्वात मोठं रॉकेट (SpaceX) तयार केलं आहे. स्टारशिप असं या रॉकेटचं नाव आहे. इलॉन मस्क हे या संस्थेचे फाऊंडर-सीईओ आहेत. या रॉकेटचा व्हिडिओ शेअर करत एका एक्स यूजरने म्हटलं, की हे रॉकेट आपल्याला मंगळावर घेऊन जाईल. (SpaceX Starship)

Elon Musk Mars Mission
Elon Musk : आता सिमकार्ड कंपन्यांचा बाजार उठवणार इलॉन मस्क.. कॉल-मेसेजसाठी वापरणार फक्त 'एक्स'!

यावर रिप्लाय देत मस्क म्हणाले, "आम्ही एक गेमप्लॅन बनवत आहोत, ज्यामध्ये एक मिलियन (दहा लाख) लोकांना मंगळावर नेण्यात येईल." अर्थात, यासाठी आतापासूनच मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे; असंही मस्क म्हणाले. भविष्यात पृथ्वी जर कधी मानवाला राहण्यायोग्य राहिली नाही, तर मंगळ ग्रहाचा पर्याय आपल्याकडे असायला हवा, असंही मस्क यांनी वेळोवेळी बोलून दाखवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.