Elon Musk: ट्विटरनंतर इलॉन मस्क यांच्या शॉपिंग लिस्टमध्ये आणखी एक कंपनी, ट्विट करत म्हणाले...

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वी मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरला खरेदी केले होते. आता मस्क आणखी एक कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
Elon Musk
Elon MuskSakal
Updated on

Elon Musk On Substack: अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याकडे सध्या जवळपास ६ कंपन्यांची मालकी आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरला तब्बल ४४ बिलियन डॉलर्स खर्चून खरेदी केल्यापासून ते सातत्याने चर्चेत आहेत. ट्विटरला खरेदी केल्यापासून प्लॅटफॉर्मवर अनेक बदल देखील केले आहेत. आता मस्क आणखी एका कंपनीला खरेदी करण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटर करत माहिती दिली आहे.

Wall Street Silver नावाच्या ट्विटर यूजरला रिप्लाय देत मस्क यांनी Substack ला खरेदी करण्याच्या आयडियावर नक्कीच विचार करतील, असे म्हटले आहे. Substack हा अमेरिकेतील ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून, याद्वारे यूजर्सला लेखन, पॉडकास्ट पब्लिश करण्याची सुविधा मिळते. तसेच, डिझाइन, पेमेंटची सुविधा देखील यावर उपलब्ध आहे. वर्ष २०१७ साली या प्लॅटफॉर्मची सुरुवात Kik Messenger आणि Jairaj Sethi यांनी केली आहे.

Elon Musk
Jio 5G: जिओचे नववर्षाचे गिफ्ट! महाराष्ट्रातील 'या' शहरांसह ११ ठिकाणी ५जी सेवा सुरू; मोफत मिळेल हाय-स्पीड इंटरनेट

Wall Street Silver या यूजरvs ट्विटर करत म्हटले की, जर Twitter आणि Substack हे दोन प्लॅटफॉर्म्स एकत्र आल्यास मोठमोठ्या कॉर्पोरेट मीडियासाठी मोठे आवाहन निर्माण होऊ शकते. यावर उत्तर देताना मस्क यांनी यावर विचार करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

Elon Musk
क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

दरम्यान, मस्क यांच्याकडे सध्या ६ कंपन्यांची मालकी आहे. यामध्ये टेस्ला, स्पेसएक्स, द बोरिंग कंपनी, न्यूरोलिंक, ट्विटर आणि ओपनएआयचा समावेश आहे. मस्क यांच्या OpenAI आणि Twitter या कंपन्या सध्या विशेष चर्चेत आहेत. मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरला खरेदी केले आहे. कंपनीला खरेदी केल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात देखील केली आहे.

Elon Musk
Royal Enfield 1986 Bill : रॉयल इंफील्ड बुलेटची किंमत फक्त 19 हजार! बिल पाहून थक्क झाले लोकं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.