Elon Musk EVM : इलॉन मस्क विरुद्ध भारतीय EVM; भाजपा नेत्यानं दिलं सडेतोड प्रत्युत्तर,जाणून घ्या काय आहे प्रकरण

EVM Security Concern : रॉबर्ट एफ. केनेडीने सांगितलं कागदी मतपत्रिकेचं महत्व;मग नेमका कश्यामुळे सुरूय वाद
Elon Musk and BJP Leader Clash Over Electronic Voting Machines
Elon Musk and BJP Leader Clash Over Electronic Voting Machinesesakal
Updated on

EVM Machine : EVM मशीन हे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वपूर्ण भूमिका बजावते. टेक दिग्गज इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (EVM) सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना 'कशालाही हॅक करता येऊ शकतं' असं विधान केलं आहे. यावर भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्या मतांचा जोरदार प्रतिवाद केला आहे.

मस्क यांनी मानवी किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे EVM हॅक होऊ शकतात, म्हणून त्यांना नष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. यावर चंद्रशेखर यांनी मस्क यांचं विधान "Large and general" असल्याचं सांगत, सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार करणं शक्य असल्याचं म्हटलं आहे.

चंद्रशेखर यांनी भारतीय EVM हे खास डिझाइन केलेले, सुरक्षित आणि कोणत्याही नेटवर्कपासून वेगळ असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, "भारतीय EVM ना इंटरनेट, ब्लूटूथ किंवा वायफायशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे हॅकिंगचा प्रश्नच उद्भवत नाही."

Elon Musk and BJP Leader Clash Over Electronic Voting Machines
Driverless Metro : 'या' शहरात धावणार देशातील पहिली ड्रॉयव्हरलेस मेट्रो; जाणून घ्या 'टारझन'ची खासियत

याशिवाय, चंद्रशेखर यांनी मस्क यांना सुरक्षित EVM तयार करण्याच्या प्रक्रियेवर एक ट्यूटोरियल देण्याची ऑफर दिली. मस्क यांच्या विधानावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं, "कशालाही हॅक करता येऊ शकतं."

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिलेले रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी EVM विषयीच्या समस्यांवर लक्ष वेधत कागदी मतपत्रिकांच्या वापराचं महत्त्व सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं, "मतदान प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप टाळण्यासाठी आपल्याला कागदी मतपत्रिकांकडे परत यायला हवं."

Elon Musk and BJP Leader Clash Over Electronic Voting Machines
'Nagastra-1' Drone : भारतीय लष्कराच्या हाती नवे ड्रोनअस्त्र; जाणून घ्या ‘नागास्त्र-१’ काय आहे,व्हायरल होतोय व्हिडीओ

थोडक्यात,सुरक्षेच्या दृष्टीकोनातून EVM मशीन वापरणं फायद्याचं की धोक्याचं यावर मतमतांतर सुरु आहेत.याबद्दल मस्क यांच्या म्हणण्यानुसार काहीही हॅक करता येऊ शकतं हे विधान सध्या जास्त चर्चेत आहे. चंद्रशेखर यांनी मस्कला दिलेल्या उत्तरांवर आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()