Elon Musk on Chandrayaan 3 : चांद्रयान-3 मोहिमेचा खर्च ऐकून इलॉन मस्कही चकित! म्हणाला..

Chandrayaan-3 Budget : इस्रोने हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांपेक्षा कमी बजेटमध्ये चांद्रयान-3 मोहीम फत्ते करून दाखवली आहे.
Elon Musk on Chandrayaan 3
Elon Musk on Chandrayaan 3eSakal
Updated on

भारताने चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यामुळे इस्रोचं संपूर्ण जगातून कौतुक होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश म्हणून आता भारताची ओळख निर्माण झाली आहे. अर्थात, या सगळ्यात या मोहिमेचं बजेट देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

इस्रोने हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांपेक्षा कमी बजेटमध्ये चांद्रयान-3 मोहीम फत्ते करून दाखवली आहे. इस्रोचं हे यश पाहून टेक जायंट इलॉन मस्कही चकित झाला आहे. स्पेस एक्स, टेस्ला आणि एक्स (ट्विटर) अशा कंपन्या इलॉनच्या मालकीच्या आहेत.

Elon Musk on Chandrayaan 3
Moon Rovers : 'चांद्रयान-3'च्या यशामुळे दिग्गज कार कंपन्यांच्या आशा वाढल्या; चंद्रावर पाठवणार अ‍ॅडव्हान्स रोव्हर्स

इलॉनची प्रतिक्रिया

एक्स (ट्विटर) वर न्यूजथिंक या अकाउंटने चांद्रयानाच्या बजेटबाबत पोस्ट केली होती. इंटरस्टेलर या हॉलिवूडपटाच्या तुलनेत अगदी कमी बजेटमध्ये भारताने चांद्रयान-3 मोहीम राबवली आहे; असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं. इलॉन मस्कने या पोस्टवर कमेंट करत, "ही भारतासाठी खरंच चांगली बाब आहे" असं म्हटलं आहे.

मंगळावर जायची तयारी सुरू

इलॉन मस्कने चांद्रयानाचं कौतुक करणं खरंच मोठी गोष्ट आहे. याला कारण म्हणजे, इलॉनच्या स्पेस एक्स कंपनीने आतापर्यंत कित्येक अंतराळ मोहीमा पार पाडल्या आहेत. एवढंच नाही, तर मस्कने मंगळावर वस्ती करण्याची महत्त्वाकांक्षी योजना देखील आखली आहे. 2050 सालापर्यंत मंगळावर मानवी वसाहत स्थापली जाईल, असंही मस्कने म्हटलं आहे.

Elon Musk on Chandrayaan 3
Chandrayaan-3 : ...आणि ते हसले! 'चांद्रयान-3'च्या यशस्वी लँडिंगनंतर के. सिवान झाले खुश; पाहा व्हिडिओ

चंद्रावर पाठवणार मानव

दरम्यान, जपानमधील एका अब्जाधीशाने मस्क यांच्या रॉकेटच्या मदतीने चंद्रावर जाण्याची योजना देखील आखली आहे. ते आपल्यासोबत जगभरातील आठ लोकांना घेऊन जाणार आहेत. ही मोहीम याच वर्षी राबवण्यात येणार होती, मात्र याबाबत अजून नवीन अपडेट आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.