Parag Agrawal : प्रायव्हेट जेट, एक ट्विट अन् मस्कचा हट्ट.. कशी गेली ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांची नोकरी?

A private jet, a tweet and Musk's insistence.. : ब्लूमबर्गच्या कर्ट बॅगनर यांनी 'बॅटल फॉर दि बर्ड' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये इलॉन मस्क आणि पराग अग्रवाल यांच्या वादाबद्दल सविस्तर लिहिलं आहे.
Parag Agrawal Elon Musk
Parag Agrawal Elon MuskeSakal
Updated on

Elon Musk sacked Parag Agrawal for petty reason : 2022 साली जेव्हा इलॉन मस्कने ट्विटर हे अ‍ॅप विकत घेतलं, तेव्हा त्याने कंपनीमध्ये झपाट्याने मोठे बदल केले होते. यातील एक मोठा निर्णय म्हणजे कंपनीचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकणं हा होता. या निर्णयावर तेव्हा मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र इलॉनने असं का केलं याचं खरं कारण आता समोर आलं आहे. याचा संबंध इलॉन मस्कच्या प्रायव्हेट जेटशी देखील आहे.

ब्लूमबर्गच्या कर्ट बॅगनर यांनी 'बॅटल फॉर दि बर्ड' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये इलॉन मस्क आणि पराग अग्रवाल यांच्या वादाबद्दल सविस्तर लिहिलं आहे. एका छोट्याशा कारणामुळे परागला आपली नोकरी गमवावी लागली, असा दावा या पुस्तकात केला आहे. (Battle for the Bird)

Parag Agrawal Elon Musk
Elon Musk Mars Mission : इलॉन मस्क 10 लाख लोकांना नेणार मंगळ ग्रहावर; सांगितला मार्स मिशनचा नवा गेम प्लॅन!

प्रायव्हेट जेट

इलॉन मस्क प्रवासासाठी आपलं प्रायव्हेट जेट वापरतो. ElonJet नावाचं एक ट्विटर अकाउंट या जेटचं लोकेशन ट्रॅक करत असायचं. ही गोष्ट इलॉन मस्कला आवडली नाही. हे अकाउंट बंद करावं अशी मागणी त्याने परागला (Parag Agrawal) केली. मात्र, परागने ही मागणी नाकारली. यानंतर याच वर्षी इलॉनने ट्विटर विकत घेतलं होतं. त्यानंतर त्याने कंपनीचा संपूर्ण बोर्ड आणि पराग अग्रवालची हकालपट्टी केली. (Elon Musk Private Jet)

इलॉन जेट

इलॉन जेट हे अकाउंट फ्लोरिडा युनिवर्सिटीच्या जॅक स्वीने या विद्यार्थ्याचं होतं. स्वीने या माध्यमातून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पॉप सिंगर टेलर स्विफ्ट, मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स, अमेझॉनचे मालक बिल गेट्स अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रायव्हेट जेटला देखील तो ट्रॅक करायचा. (Private Jet Tracker)

Parag Agrawal Elon Musk
जगभरातून झाली ट्रोल, अखेर टेलर स्विफ्टला विकावं लागलं प्रायव्हेट जेट!

टेलर स्विफ्टही वादात

जॅक स्वीने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आहे. पॉप सिंगर टेलर स्विफ्टने अवघ्या 13 मिनिटांच्या प्रवासासाठी प्रायव्हेट जेट वापरल्याचं जॅकने सांगितलं होतं. यानंतर जगभरातील पर्यावरणवाद्यांनी टेलरला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. अखेर, ट्रोलिंगला कंटाळून टेलर स्विफ्टने आपलं प्रायव्हेट जेट विकून टाकलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.