Elon Musk भारतात 'सॅटेलाइट इंटरनेट प्रोजेक्ट' आणण्याच्या तयारीत; Jio आणि Airtel ला मिळू शकते टक्कर

elon musk.jpg
elon musk.jpg
Updated on

नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे इलॉन मस्क यांनी ऑटोमोबाईल सेक्टर आणि अंतराळ क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. आता मस्क यांचा टेलीकॉम सेक्टरमध्येही गुंतवणूक करण्याचा विचार दिसत आहे. त्यादृष्टीनेच त्यांनी प्रयत्नही सुरु केले आहेत. याची सुरुवात भारतातून करण्याच्या विचारात मस्क आहेत.

मागील काही महिन्यांपासून भारतातील टेलीकॉम क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एका मीडियाच्या रिपोर्टनुसार स्पेस एक्स भारतात सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा सुरु करु शकते.  Starlink प्रोजेक्टद्वारे ही कंपनी जगातील कोणत्याही कोपऱ्यात इंटरनेट सेवा पुरवू शकते. कंपनीच्या मते या सेवेचे जगभरात सध्या 10 हजार ऍक्टीव्ह युजर्स आहेत.

CNBC-TV18 च्या एका रिपोर्टनुसार, इलॉन मस्क सध्या SpaceX कंपनी च्या Starlink प्रोजेक्टला भारतात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. रिपोर्टनुसार मस्क यांची नजर भारत आणि चीनमधील 1 ट्रिलीयन मार्केटवर आहे. कंपनी या दोन्ही देशात इन-फ्लाइट इंटरनेट आणि मरीनटाइम सर्विसेसही देऊ इच्छीते आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, ट्रायने ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी वाढविण्याबाबत सल्लामसलतपत्र जारी केले होते. ज्याला उत्तर म्हणून स्पेसएक्स सॅटेलाइट गवर्नमेंट अफेयर च्या वाइस प्रेसिडेंट पेट्रीसिया कूपर यांनी म्हटले आहे की, जर सरकारने स्टारलिंकच्या उच्च सहकार्याने सहमती दर्शविली तर हाई-स्पीड सॅटेलाइट नेटवर्कच्या माध्यामातून सर्व भारतीयांना येत्या काळात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते.

(edited by- pramod sarawale)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.