Neuralink : मेंदूमध्ये 'चिप' बसवलेल्या रुग्णाने केवळ इशाऱ्यांनी वापरला माऊस; इलॉन मस्कने दिली गुडन्यूज! सांगितला पुढचा प्लॅन

Brain Chip : न्यूरालिंकच्या माध्यमातून मेंदूच्या एका विशिष्ट भागात चिप बसवण्यात येत आहे. या माध्यमातून हालचाल करण्यासाठी सिग्नल देणाऱ्या सेल्सवर नियंत्रण मिळवण्याचा इलॉन प्रयत्न करत आहे.
Neuralink Brain Chip
Neuralink Brain ChipeSakal
Updated on

Elon Musk Neuralink Update : इलॉन मस्कच्या न्यूरालिंक कंपनीने यावर्षी जानेवारी महिन्यात एका रुग्णाच्या मेंदूमध्ये चिप बसवली होती. जगातील हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. याबाबत आता एक मोठी अपडेट इलॉनने शेअर केली आहे.

मेंदूमध्ये चिप (Brain Chip) बसवलेली ही व्यक्ती आता केवळ मनामध्ये विचार करून कम्प्युटर माऊस ऑपरेट करू शकते, असं इलॉनने सांगितलं आहे. सध्या या व्यक्तीला केवळ माऊसचा कर्सर फिरवता येत आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये माऊसचं बटण कंट्रोल करता येतं का हे तपासलं जाणार आहे असंही इलॉनने स्पष्ट केलं. (Neuralink Patient Control Mouse)

Neuralink Brain Chip
Elon Musk Mars Mission : इलॉन मस्क 10 लाख लोकांना नेणार मंगळ ग्रहावर; सांगितला मार्स मिशनचा नवा गेम प्लॅन!

काय आहे न्यूरालिंक प्रोजेक्ट?

आपल्या शरीरामधील न्यूरॉन्स हे इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नल्सचा वापर करून मेंदूपासून अवयवांपर्यंत, आणि अवयवांपासून मेंदूपर्यंत माहिती पोहोचवत असतात. काही कारणामुळे वा आजारामुळे कित्येक व्यक्तींना आपल्या शरीराची हालचाल करता येत नाही. अशा वेळी मेंदू आणि त्या अवयवामध्ये न्यरॉन्सची देवाणघेवाण होत नसते.

न्यूरालिंकच्या माध्यमातून मेंदूच्या एका विशिष्ट भागात चिप बसवण्यात येत आहे. या माध्यमातून हालचाल करण्यासाठी सिग्नल देणाऱ्या सेल्सवर नियंत्रण मिळवण्याचा इलॉन प्रयत्न करत आहे. (What is Neuralink Project)

सध्या या प्रोजेक्टच्या (Neuralink) माध्यमातून रुग्णांना केवळ विचार करून मोबाईल, कम्प्युटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस कंट्रोल करणं शिकवलं जात आहे. न्यूरालिंक प्रोजेक्टवर इलॉन मस्क गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिका सरकारने या चिपच्या मानवी चाचणीला परवानगी दिली होती. यानंतर तातडीने रुग्णांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती.

Neuralink Brain Chip
Elon Musk : मस्कने घेतलं डिज्नीशी वैर! कंपनीवर खटला दाखल करण्याचं आवाहन; स्वतः करणार वकिलांचा खर्च.. काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.