Xmail Elon Musk : आता थेट गुगलशी पंगा घेणार इलॉन मस्क; लवकरच येऊ शकतं 'जी-मेल'च्या तोडीचं 'एक्स-मेल'

Elon Musk Email Service : सध्या मार्केटमध्ये ई-मेल म्हटलं की Gmail आणि Outlook हे दोन मोठे प्लेयर्स समोर येतात. सामान्य यूजर्ससाठी जीमेल हाच सध्या सर्वात सोपा आणि भरपूर फीचर्स देणारा पर्याय आहे.
Xmail Elon Musk
Xmail Elon MuskeSakal
Updated on

Elon Musk Hints Xmail Service : 'एक्स'ला एव्हरिथिंग अ‍ॅप बनवण्यासाठी इलॉन मस्कने आतापर्यंत कित्येक मोठ्या कंपन्यांशी पंगा घेतला आहे. इतर कित्येक अ‍ॅप्समध्ये मिळणारे फीचर्स एकट्या एक्स अ‍ॅपमध्ये देऊन मस्कने फेसबुक, लिंक्डइन, व्हॉट्सअ‍ॅप अशा कित्येक टेक कंपन्यांना टक्कर दिली आहे. आता गुगलच्या जी-मेलला पर्याय म्हणून मस्क 'एक्स-मेल' सुरू करण्याची शक्यता आहे.

एक्सच्या एका इंजिनिअरने या प्लॅटफॉर्मवर असं विचारलं होतं, की "आपण एक्स-मेल कधी बनवणार आहे?" यावर उत्तर देत मस्कने हे लवकरच होऊ शकतं असं म्हटलं आहे. यानंतर कित्येक नेटिझन्सनी यावर आनंद व्यक्त केला आहे. जी-मेलला हा चांगला पर्याय ठरू शकतो, असं यूजर्स म्हणत आहेत. (Elon Musk on Xmail)

गुगल-मायक्रोसॉफ्टला किती धोका?

सध्या मार्केटमध्ये ई-मेल म्हटलं की Gmail आणि Outlook हे दोन मोठे प्लेयर्स समोर येतात. सामान्य यूजर्ससाठी जीमेल हाच सध्या सर्वात सोपा आणि भरपूर फीचर्स देणारा पर्याय आहे. इलॉन मस्क जर खरोखरच ई-मेल सुविधा लाँच करणार असेल, तर त्याला गुगलच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी कित्येक फीचर्स यामध्ये द्यावे लागणार आहेत.

Xmail Elon Musk
Elon Musk : आता सिमकार्ड कंपन्यांचा बाजार उठवणार इलॉन मस्क.. कॉल-मेसेजसाठी वापरणार फक्त 'एक्स'!

जीमेल होणार बंद?

या दरम्यान, सध्या इंटरनेटवर एक अफवा पहायला मिळत आहे. 1 ऑगस्ट 2024 पासून गुगलची जीमेल सेवा बंद होणार असल्याचं यात म्हटलं आहे. मात्र असं काही होणार नसल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे. गुगलने एका एक्स पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे जीमेल यूजर्सना घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()