SpaceX Mobile Network : आता पृथ्वीवर कुठेही मिळेल नेटवर्क; इलॉन मस्कने थेट स्पेसमध्ये उभारला मोबाईल टॉवर!

Direct to Cell : स्पेसएक्सने नुकतेच अवकाशात 21 नवे हायटेक उपग्रह लाँच केले आहेत. यापैकी 6 उपग्रह हे इनोव्हेटिव्ह 'डायरेक्ट टू सेल' सेवेला सपोर्ट करण्यासाठी तयार केले आहेत.
SpaceX Mobile Network
SpaceX Mobile NetworkeSakal
Updated on

Mobile Tower in Space : इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचे स्टारलिंक हे आतापर्यंत केवळ सॅटेलाईट इंटरनेट सेवा उपलब्ध करून देत होतं. मात्र, आता नव्या सॅटेलाईटच्या माध्यमातून स्पेसएक्सने थेट मोबाईल टॉवरच अवकाशात लाँच केला आहे. जगभरात कुठल्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तीला मोबाईल नेटवर्क उपलब्ध व्हावं यासाठी मस्कने ही नवीन मोहीम हाती घेतली आहे. (Elon Musk SpaceX)

स्पेसएक्सने नुकतेच अवकाशात 21 नवे हायटेक उपग्रह लाँच केले आहेत. यापैकी 6 उपग्रह हे इनोव्हेटिव्ह 'डायरेक्ट टू सेल' (Direct to Cell) सेवेला सपोर्ट करण्यासाठी तयार केले आहेत. या माध्यमातून जागतिक स्तरावर डेड झोन्स संपवण्याच्या उद्दिष्टाने हे लाँच केले आहेत. इलॉन मस्कने (Elon Musk) 2022 सालीच याबाबत घोषणा केली होती.

सध्या अमेरिकेत नेटवर्क

ही मोहीम यशस्वी झाल्यास सुरुवातीला अमेरिकेत टी-मोबाईल (T-Mobile) नेटवर्क असणाऱ्या 4G-LTE फोनवर याची चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर यातच टेक्स्ट मेसेजिंग सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती स्पेसएक्सने दिली.

SpaceX Mobile Network
Elon Musk School : आता शिक्षण क्षेत्रातही उतरणार इलॉन मस्क! शाळा-कॉलेज उभारण्याची सुरू आहे तयारी - रिपोर्ट

सध्या या माध्यमातून केवळ टेक्स्ट मेसेजची चाचणी घेण्यात येणार आहे. 2025 च्या शेवटपर्यंत मेसेज सोबतच व्हॉईस कॉल, डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) अशा सेवाही या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत. (SpaceX Mobile Network)

संपूर्ण जगात मोबाईल नेटवर्क

इलॉन मस्कने स्पेसएक्सची पोस्ट एक्सवर (ट्विटर) शेअर केली आहे. "या मोहिमेमुळे जगभरात कुठेही मोबाईल नेटवर्क उपलब्ध होणार आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या नेटवर्क्सना मात्र यामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही" असं मस्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()