Elon Musk on Grok : ओपन एआय सारखी नफेखोर नसणार आमची कंपनी; 'ग्रॉक' असणार पूर्णपणे ओपन सोर्स! इलॉन मस्कची मोठी घोषणा

xAI Grok : इलॉन मस्कने काही महिन्यांपूर्वी xAI ही एआय स्टार्टअप कंपनी सुरू केली होती. यानंतर त्याने आपला स्वतःचा Grok हा चॅटबॉट देखील लाँच केला.
Elon Musk on Grok
Elon Musk on GrokeSakal
Updated on

Elon Musk to Open Source xAI Grok : गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क हा चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपन एआय कंपनीवर टीका करत आहे. ही कंपनी लोकांच्या भल्यासाठी एआयचा वापर करणार होती. मात्र, आता केवळ नफा मिळवण्याच्या दृष्टीने कंपनी विचार करत आहे, असं इलॉन मस्कचं म्हणणं आहे. यादरम्यान, आपण त्यांच्यासारखे नसून; आपला एआय चॅटबॉट नॉन-प्रॉफिटेबल असेल अशी घोषणा मस्कने केली आहे.

इलॉन मस्कने काही महिन्यांपूर्वी xAI ही एआय स्टार्टअप कंपनी सुरू केली होती. यानंतर त्याने आपला स्वतःचा Grok हा चॅटबॉट देखील लाँच केला. या आठवड्यापासून आपला हा एआय चॅटबॉट पूर्णपणे ओपन सोर्स असेल; असं मस्कने एका एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये स्पष्ट केलं.

ओपन एआयवर टीका

मस्कच्या या पोस्टला रिप्लाय देत एका यूजरने म्हटलं, की ओपन एआयने देखील असंच करायला हवं. त्यावर प्रतिक्रिया देत मस्कने ओपन एआयला खोटारडे म्हटलं. (Elon Musk on Open AI)

Elon Musk on Grok
X TV App : आता यूट्यूबचा बाजार उठवणार इलॉन मस्क? लवकरच येणार 'एक्स'चं टीव्ही अ‍ॅप, पाहता येणार मोठे व्हिडिओ

ओपन एआयशी वाद

इलॉन मस्कने असं म्हटलं आहे, की ओपन एआय ही कंपनी स्थापन करताना आपण केवळ एका अटीवर त्यात सहभागी झालो होतो. ती अट म्हणजे, ही कंपनी एआयचा वापर सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी करेल, आणि नफा कमावण्याच्या मागे लागणार नाही. मात्र मायक्रोसॉफ्टने 49% भागीदारी घेतल्यापासून ही कंपनी सातत्याने नफा कमावण्याबाबत पावलं उचलत आहे. यामुळे आपल्यासोबत केलेल्या कराराचा भंग झाला आहे. या मुद्द्यावरुन मस्कने ओपन एआय कंपनीला कोर्टातही खेचलं आहे.

Elon Musk on Grok
Elon Musk Grok AI : आता भारतात देखील उपलब्ध होणार इलॉन मस्कचा 'ग्रॉक' एआय चॅटबॉट; भन्नाट आहेत फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()