Elon Musk Tweet : ट्विटरचा पक्षी होणार गायब? इलॉन मस्कने धडाधड ट्विट करत दिले संकेत; मोठे बदल अपेक्षित

ट्विटरवर इलॉन मस्कने एक पोलही पोस्ट केला आहे..
elon musk twitter
elon musk twitterSakal
Updated on

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून त्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. मात्र, आता ट्विटर हा ब्रँडच गायब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इलॉन मस्कने आज सकाळपासून धडाधड काही ट्विट्स करत याबाबत संकेत दिले आहेत.

ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात येणार असून, लवकरच आपण ट्विटर ब्रँडला अलविदा करू. ट्विटरसोबतच हळू हळू सर्वच पक्ष्यांना आपण उडवून लावू, अशा आशयाचं ट्विट मस्क यांनी केलं आहे. यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

पोल केला पोस्ट

यापूर्वी इलॉन मस्कने एक पोल देखील ट्विट केला होता. यात ट्विटरचा प्लॅटफॉर्म रंग बदलण्याबाबत यूजर्सची मतं मागितली आहेत. ट्विटरचा डिफॉल्ट प्लॅटफॉर्म रंग सध्या पांढरा आहे, मात्र डार्क मोड ऑन करून यूजर्स तो काळाही करू शकतात. हा रंग कायमचा ब्लॅक करावा का, याबाबत मस्कने मतं मागवली आहेत. यात ६० टक्क्यांहून अधिक यूजर्सनी काळ्या रंगाला पसंती दर्शवली आहे.

elon musk twitter
Elon Musk Twitter : ट्विटरवर आता मेसेज पाठवण्यालाही लिमिट लागू, सबस्क्राईबर वाढवण्यासाठी मोठा निर्णय

पक्ष्याच्या जागी येणार दुसरा लोगो

मस्कने ट्विटरचा लोगो बदलण्याबाबत देखील एक ट्विट केलं आहे. यामध्ये ब्लॅक बॅकग्राऊंडला व्हाईट लोगो हवा असल्याचं तो म्हणाला आहे. त्यातही ट्विटरच्या पक्ष्याऐवजी X हे लेटर असावं असं त्याचं म्हणणं आहे. आज रात्रीपर्यंत एखादा चांगला लोगो कुणी पोस्ट केला, तर त्याचा वापर आपण उद्यापासूनच करू, असंही तो म्हणाला आहे.

इलॉन मस्कने सकाळपासून असे भरपूर ट्विट केल्यामुळे आता ट्विटरमध्ये मोठे बदल घडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मस्कने यासोबतच 'एक्स' या लोगोचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबतच इलॉनने 'Deus X' असं ट्विट केलं आहे. इंग्रजीमध्ये याचा अर्थ 'God X' असा आहे. यामुळे हा 'X' आता ट्विटरचा नवीन लोगो असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

elon musk twitter
Threads Vs Twitter : 'स्पर्धा ठीक आहे, पण चीटिंग नाही..'; थ्रेड्स अ‍ॅपवरून मेटाला कोर्टात खेचणार इलॉन मस्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.