Elon Musk : 'एक्स'वर काही पोस्ट किंवा लाईक केल्यामुळे नोकरीत होतोय भेदभाव? बॉसला खेचा कोर्टात; मस्क करणार सगळा खर्च

X : इलॉन मस्कने केलेली ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Elon Musk
Elon MuskeSakal
Updated on

इलॉन मस्क हा आपल्या 'एक्स' (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असतो. आपल्या जवळपास सर्व घोषणा आणि म्हणणं मांडण्यासाठी तो या प्लॅटफॉर्मचा आधार घेतो. आज सकाळी देखील त्याने केलेलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

जर एखाद्या यूजरला 'एक्स'वर केलेल्या पोस्ट किंवा लाईकमुळे नोकरीच्या ठिकाणी त्रास सहन करावा लागत असेल; तर त्याच्या पाठीशी इलॉन मस्क उभा राहणार आहे. या व्यक्तीच्या कायदेशीर लढाईचा सगळा खर्च आपण करणार असल्याचं इलॉन मस्कने म्हटलं आहे.

Elon Musk
Twitter Stock Trading: ट्विटरवर होणार शेअर्सचे व्यवहार? इलॉन मस्कने स्पष्टच सांगितलं

काय आहे ट्विट?

इलॉन मस्क लिहितो, "जर तुमच्या एम्प्लॉयरने तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर काही लाईक किंवा पोस्ट केल्यामुळे चुकीची वागणूक दिली असेल, तर आम्ही तुमची कायदेशीर फी भरू. याला कोणतीही लिमिट नसेल. कृपया आम्हाला अशा घटनांबाबत माहिती द्या." अशा आशयाचं ट्विट मस्क यांनी केलं आहे.

जस्टिस फॉर कारा

इलॉनच्या या ट्विटला लिब्स ऑफ टिकटॉक या एक्स हँडलने रिप्लाय दिला आहे. त्यांच्या अकाउंटला फॉलो केल्यामुळे कारा नावाच्या एका महिलेला नोकरी गमवावी लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यानंतर इलॉन यांनी कारा या महिलेला हे खरं आहे का? असं विचारलं. तर तिने रिप्लाय देत हे खरं असल्याचं म्हटलं आहे. यानंतर कित्येक यूजर्स काराला न्याय मिळावा असं कमेंट करत आहेत.

Elon Musk
Twitter Live : आता 'एक्स'वरील लाईव्ह फीचरमध्ये मोठा बदल; इलॉन मस्कने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.