Elon Musk : इलॉन मस्कनी दिली अजब-गजब जॉब ऑफर; एका तासाला 5 हजार रुपये, कोटींच्या पॅकेजची नोकरी आहे तरी काय?

Elon Musk recruiting AI tutors for xAI company : इलॉन मस्क यांच्या xAI कंपनीमध्ये AI ट्यूटर म्हणून नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Elon Musk recruiting AI tutors
Elon Musk recruiting AI tutors for xAI companyesakal
Updated on

Elon Musk Job Offer : AI तंत्रज्ञानाच्या जगात नवीन संधीची चाहूल लागली आहे. Elon Musk यांच्या xAI कंपनीने AI ट्यूटरसाठी भरती सुरू केली असून, या भूमिकेसाठी प्रति तास 5000 रुपयांपर्यंत वेतन मिळण्याची शक्यता आहे.

नोकरीत काय काम करायचं?

AI ट्यूटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची मुख्य जबाबदारी म्हणजे xAI च्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींना योग्य डेटा आणि प्रतिसाद देऊन त्यांना अधिक स्मार्ट बनवणे. या प्रक्रियेत ट्यूटरला कंपनीच्या सॉफ्टवेअरचा वापर करून डेटा लेबल करणे, म्हणजेच त्याचा अर्थ AI ला समजावून देणे, असे काम करावे लागेल. याशिवाय, AI प्रणालींच्या सुधारणेसाठी नवीन टास्क तयार करणे आणि भाषेच्या समजुतीवर काम करणे या कामाचा भाग असेल.

Elon Musk recruiting AI tutors
Samsung Galaxy A16 5G : दिवाळीआधीच सॅमसंगचा धमाका; 20 हजारपेक्षा कमी किंमतीत लाँच केला Galaxy A16 5G स्मार्टफोन,एकदम खास फीचर्स बघाच

कुणाला मिळणार संधी?

AI ट्यूटरसाठी इंग्रजी वाचन आणि लेखनात चांगले असणे आवश्यक आहे. तांत्रिक पार्श्वभूमी नसली तरी चालेल, परंतु लेखन, पत्रकारिता किंवा संशोधनातील अनुभव असलेल्यांना या भूमिकेसाठी प्राधान्य दिले जाईल. संशोधन क्षमता, स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल आवड असणाऱ्या उमेदवारांना या संधीचा लाभ होऊ शकतो.

Elon Musk recruiting AI tutors
Flipkart Big Diwali Sale : उद्यापासून फ्लिपकार्टचा Big Diwali Sale सुरू; काय आहेत खास डिस्काउंट ऑफर्स? पाहा एका क्लिकमध्ये..

हे काम पूर्णतः वर्क फ्रॉम होम पद्धतीचे असेल. दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर, आपल्याला आपल्या वेळापत्रकानुसार काम करण्याची मुभा असेल. या नोकरीसाठी 9 AM ते 5:30 PM या वेळेत काम करणे अपेक्षित आहे, परंतु वेळेत लवचिकता असणार आहे. प्रति तास $35 ते $65 (सुमारे 5000 रुपये) वेतनासोबत वैद्यकीय आणि इतर विमा लाभ देखील दिले जातील.

जर तुम्हाला तंत्रज्ञानाची आवड असेल आणि डेटा व्यवस्थापन, लेखनात आवड असेल, तर AI ट्यूटरची ही संधी तुम्हाला उज्ज्वल भविष्याची दिशा देऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.