SpaceX Starship Landing : इलॉन मस्कच्या स्पेसएक्सने केली कमाल; Starship रॉकेटचं समुद्रावर यशस्वी लँडिंग,व्हिडीओ पाहिलात काय?

SpaceX Elon Musk : तीन अयशस्वी चाचण्यांनंतर चौथ्या प्रयत्नात आले यश,रॉकेट लाँच-लँडिंग यशस्वी
SpaceX's Starship Completes Soft Ocean Landing
SpaceX's Starship Completes Soft Ocean Landingesakal
Updated on

Starship Ocean Landing : इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या स्टारशिप रॉकेट प्रणालीने चौथ्या चाचणी उड्डाणात मोठी झेप घेतली आहे. या उड्डाणात स्टारशिप यानाने पहिल्यांदा समुद्रात यशस्वी लँडिंग केले आहे. या चाचणी उड्डाणाचा उद्देश्य रॉकेटचा वरील भाग असलेल्या 'शिप'ला वातावरणात नियंत्रित स्थितीत परत आणून महासागरात (Indian Ocean) वर उतरवणे असे होते.

नियंत्रित स्थितीत खाली येत असताना शेवटच्या क्षणी काही भाग तुटलेले दिसत असले तरीही हे यान यशस्वीरित्या समुद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. कंपनीने अधिकृत ट्विटर हँडलवर या यशस्वी उड्डाणाबद्दल माहिती दिली आहे.

यापूर्वीच्या चाचणी उड्डाणांमध्ये बूस्टर जमिनीवर कोसळून नष्ट झाला होता. परंतु या उड्डाणात बूस्टरला मेक्सिकोच्या आखातात पाण्याच्या थोड्या वर आणून स्थिर करण्यात यश आले आहे.

SpaceX's Starship Completes Soft Ocean Landing
Sunita Williams Starliner : सुनीता विल्यम्सची अवकाश झेप यशस्वी; स्पेस डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल,तुम्ही पाहिलात काय?

अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क आणि त्यांची स्पेसएक्स कंपनी पूर्णपणे आणि जलद गतीने पुन्हा वापरता येणारी कक्षीय रॉकेट प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहेत. हे यशस्वी झाले तर ते जगातला पहिला असा रॉकेट असेल.

स्टारशिप हे रॉकेट टेक्सासच्या किनारपट्टीवरील बोका चिका येथील संशोधन आणि विकास केंद्रातून उड्डाण केले. या चौथ्या चाचणी उड्डाणाची सुरुवातही आधीच्या तीन चाचणी उड्डाणांप्रमाणेच झाली. जमिनीपासून सवा दोन मिनिटांनंतर शिप आणि बूस्टर वेगळे झाले.

शिप अटलांटिकच्या दिशेने पुढे गेले तर रॉकेटचा खालचा भाग किनार्याच्या जवळील ठिकाणी उतरणाच्या ठिकाणी परत आला. इंजिनाच्या साहाय्याने बूस्टरने अगोदर समुद्राच्या पृष्ठभागावर स्वतःला थांबवले आणि नंतर झुकले. हा प्रकारचा मॅन्यूवर भविष्यात बोका चिकामध्ये पुन्हा लँडिंग करण्यासाठीचा पूर्वाभ्यास होता.

शिपला अधिक उंच आणि वेगवान जावे लागते. त्यामुळे ते परत येताना वातावरणात प्रवेश करताना अतिशय उष्णतेचा सामना करावे लागते. वातावरणात खोलवर उतरताना यानाभोवती अतिशय तापलेले आणि आयनीकृत वायू असलेले प्लाझमा दिसून आले. लँडिंगच्या शेवटच्या टप्प्यात उष्णता प्रतिरोधी टाईल्स निघून गेल्या, काही संरचनात्मक घटक लालबुंद झळाळू लागल्या आणि लेन्स क्रॅक झाल्यामुळे कॅमेराचा दृश्य अस्पष्ट झाले.

SpaceX's Starship Completes Soft Ocean Landing
Japan Wooden Satellite : जपानने तयार केला जगातील पहिला 'लाकडी उपग्रह', अमेरिका करणार लाँच.. काय आहे कारण?

परंतु या सर्व अडचणींवर मात करत स्टारशिपने समुद्रावर जवळजवळ लँडिंग करण्यात यश मिळवले आहे. हे लँडिंग किती यशस्वी झाले याचा पूर्णपणे अंदाज लवकरच येईल.मात्र, सर्वसाधारणपणे ही चाचणी उड्डाण मस्क आणि स्पेसएक्ससाठी मोठी प्रगती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.