Elon Musk: इलॉन मस्कला मोठा धक्का! ट्विटरवर 2,000 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा; काय आहे प्रकरण?

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून, कंपनी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वादात सापडली आहे.
Elon Musk Twitter
Elon Musk Twitter esakal
Updated on

Elon Musk: इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून, कंपनी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वादात सापडली आहे. आता नॅशनल म्युझिक पब्लिशर्स असोसिएशन (NMPA) या संगीत कंपन्यांच्या संघटनेने ट्विटरवर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला आहे.

परवानगीशिवाय आपल्या प्लॅटफॉर्मवर संगीत अपलोड करण्याची परवानगी देऊन कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप ट्विटरवर करण्यात आला आहे. यासाठी संघटनेने ट्विटरकडून सुमारे 2,000 हजार कोटी रुपये (250 दशलक्ष डॉलर) भरपाईची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, काही काळापूर्वी ट्विटर ब्लू वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर 2 तासांपर्यंतचा कंटेंट अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती. ही सेवा सुरू केल्यानंतर, ब्लू वापरकर्ते ट्विटरवर कंटेंट अपलोड करत आहेत.

नॅशनल म्युझिक पब्लिशर्स असोसिएशनमध्ये युनिव्हर्सल म्युझिक पब्लिशिंग ग्रुप, वॉर्नर चॅपल म्युझिक आणि सोनी म्युझिक पब्लिशिंगसह 17 संगीत कंपन्या आहेत.

यांनी एकत्रितपणे, टेनेसी राज्याच्या फेडरल कोर्टात 250 दशलक्ष डॉलर नुकसानीची मागणी करणारा खटला दाखल केला आहे. NMPA याआधीही Tiktok, Twitch, Peloton, Roblox आणि इतर काही कंपन्यांवर अशीच कायदेशीर कारवाई केली आहे.

या प्रकरणांमध्ये, एकतर उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना संगीत कंपन्यांशी न्यायालयाबाहेर तोडगा काढावा लागला किंवा न्यायालयाने संगीत कंपन्यांच्या बाजूने निर्णय दिला.

NMPA ने जवळपास 1,700 गाण्यांची यादी शेअर केली आहे जी परवानगीशिवाय ट्विटरवर अपलोड करण्यात आली आहेत. प्रत्येक उल्लंघन केलेल्या गाण्यासाठी कंपन्या 1,50,000 डॉलर (रु. 1.25 कोटी) पर्यंत नुकसान भरपाई मागत आहेत.

असोसिएशनने सांगितले की ते 250 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त एकूण नुकसानीची मागणी करत आहे. ट्विटरने या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Elon Musk Twitter
SEBI On Mehul Choksi: फरार मेहुल चोक्सीला सेबीचा मोठा दणका, बँक, डीमॅट, म्युच्युअल फंड खाती...

एनएमपीएचे अध्यक्ष आणि सीईओ डेव्हिड इसरलाइट म्हणतात की, असोसिएशनने ट्विटरला कॉपीराइट उल्लंघनाची माहिती दिली.

परंतु कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही आणि आता वेगवेगळ्या खात्यांमधून कंटेंट सतत अपलोड केला जात आहे जे कॉपीराइट नियमांच्या विरोधात आहे.

ट्विटरने त्यांची परवानगी घेतली नाही आणि नियमांचे उल्लंघन करत असल्याचे संगीत असोसिएशनने म्हटले आहे.

Elon Musk Twitter
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.