Twitter News : एलॉन मस्कच्या अधिपत्याखालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) आता युजर्स त्यांच्या प्रोफाइलवर कोणत्या पोस्ट लाईक करतात हे सार्वजनिकपणे दाखवणार नाही. कंपनीचे इंजिनियरिंग डायरेक्टर हौफेई वांग यांनी या बदलाची पुष्टी केली आहे.
वांग यांच्या मते, सार्वजनिक लाईक्समुळे चुकीचे वापरकर्ता वाढीस लागले आहे. या बदलामुळे युजर्स त्यांना खरोखर आवडलेल्या पोस्ट लाईक करू शकतील, एवढेच नाही तर कोण पाहणार याची चिंता न करता ते स्वतंत्रपणे लाईक करू शकतील.
तरीही, युजर्सना अजून त्यांच्या पोस्टवर कोण लाईक करतो हे पाहायला मिळेल. तसेच, त्यांच्या पोस्टवरील लाईक्सची संख्या, रिप्लाय आणि इतर वैशिष्ट्ये पाहता येतील. या बदलाचा मुख्य उद्देश म्हणजे, कोणत्या पोस्टवर कोणत्या युजर्सनी लाईक केले हे लपवणे. त्यामुळे प्रोफाइलवरील "लाइक केलेले" (Liked) हा टॅब पूर्णपणे काढून टाकण्याची योजना आहे.
यापूर्वी युजर्स स्वतः हे फीचर लपवू शकत होते, पण आता ट्विटर हे पूर्णपणे हटवण्याच्या विचारात आहे. हे मस्कच्या ट्विटरच्या पदभार स्वीकरणानंतरचा आणखी एक मोठा बदल ठरेल. याआधीची ट्विटरची सिस्टीम आता X.com वर हलवली आहे. म्हणजेच, टेकओवरनंतर याआधी सर्व सिस्टमनच्या URL मध्ये "twitter.com" होते ते आता "X.com" झाले आहे.
एवढेच नाही तर, मस्क यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, X नवीन वापरकर्त्यांना पोस्ट करणे, लाईक करणे, बुकमार्क करणे किंवा रिपोस्ट करणे यासारख्या मूलभूत सुविधांसाठी शुल्क आकारेल. ही सदस्यता फक्त वार्षिक १०० रुपये असेल. सध्या न्यूझीलंड आणि फिलिपिन्स येथे याची चाचणी सुरू असून, पुढे जागतिक स्तरावर ही सेवा आणण्याचा कंपनीचा विचार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.