X Online Payment Feature : इलॉन मस्क यांच्या 'X' मध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा; कसं वापराल नवीन फीचर? वाचा एका क्लिकवर

Elon Musk Latest Update : लवकरच एक्सवर पेमेंटची सुविधा येणार आहे. त्यामुळे जगभरातील लाखो वापरकर्त्यांना एक्सवरच पेमेंट करण्याची सोय होणार आहे.
X Transaction
X to Launch Payment Services Soonesakal
Updated on

X Online Transaction Feature : एक्सचे (पूर्वीचे ट्विटर) मालक इलॉन मस्क यांच्या मालकीनंतर या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फीचर्स येत आहेत. आता या प्लॅटफॉर्मवर एक नवीन धमाकेदार फीचर येणार आहे. लवकरच एक्सवर पेमेंटची सुविधा उपलब्ध होणार आहे.

इलॉन मस्क यांचे एक्सला सुपर अॅप बनवण्याचे स्वप्न आहे. त्या दिशेनं कंपनी काम करत आहे. याच कामाचा भाग म्हणून लवकरच एक्सवर पेमेंटची सुविधा देण्यात येणार आहे. याबाबत एका रिसर्चरने माहिती दिली आहे.

याआधी एक्स म्हणजे फक्त माहिती शेअर करण्याचे माध्यम होते. पण मस्क आल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ, ऑडिओ कॉलिंग, सबस्क्रिप्शन अशा अनेक फीचर्स आले. आता या प्लॅटफॉर्मवर पेमेंटची सुविधा येणार आहे.

X Transaction
Laddu Mutya Baba: फिरता पंखा हातानं थांबवला अन् लड्डू मुत्त्या बाबाचं भांडं फुटलं; विज्ञानामुळं उलगडलं सत्य,व्हिडिओ पाहा

एका रिसर्चरने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच एक्सवर पेमेंटची सुविधा येणार आहे. त्यामुळे जगभरातील लाखो वापरकर्त्यांना एक्सवरच पेमेंट करण्याची सोय होणार आहे. रिसर्चर निमा ओव्ही यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

रिसर्चरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, एक्सच्या लेफ्ट-हँड नेव्हिगेशन पॅनेलमध्ये बुकमार्क फीचरच्या खाली पेमेंट ऑप्शन दिसणार आहे. या नव्या फीचरमुळे वापरकर्ते पैसे ट्रान्सफर करू शकतील, त्यांचे बॅलन्स चेक करू शकतील आणि ट्रांजेक्शन हिस्ट्री पाहू शकतील. एक्सवर पेमेंट वॉलेट सिस्टमवर बेस्ड असेल की थेट बँक अकाऊंटशी लिंक असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

X Transaction
WhatsApp VC Feature : व्हिडिओ कॉलिंगसाठी व्हॉट्सॲपने आणलं नवं फीचर; कसं सुरू कराल लो-लाइट मोड? काय आहे फायदा,जाणून घ्या

दरम्यान, एक्स आपल्या एआय मॉडेलला ट्रेन करण्यासाठी पब्लिक ट्वीट्स आणि चॅटबॉट इंटरॅक्शनचा वापर करत आहे. पण कंपनी वापरकर्त्यांना त्यांचा डेटा ग्रोकला ट्रेन करण्यासाठी वापरण्यापासून बाहेर पडण्याचा पर्याय देते.

कंपनीने मे महिन्यापासून आपल्या मदत पेजवर ऑप्ट-आउट सूचना दिल्या आहेत, पण कंपनीने कधीही स्पष्ट केले नाही की जे वापरकर्ते आपला ट्वीट डेटा एआय मॉडेल प्रशिक्षणासाठी वापरण्याची इच्छा नाहीत ते ऑप्ट आउट करू शकतात. कंपनीने एक्सवर आपल्या सेफ्टी हँडलवरून एक पोस्टद्वारे ही सुविधा जाहीर केली. जे वापरकर्ते ग्रोकद्वारे त्यांचा डेटा वापरण्यापासून बाहेर पडू इच्छितात ते या सूचनांचे अनुसरण करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.