नागपूर : दिवाळी किंवा दसऱ्याला पसंतीची नवीन कार अथवा दुचाकी खरेदी करायची असेल तर त्वरा करा. अन्यथा तुमच्या आनंदावर विरजण पडू शकते. कारण कार निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सेमिकंडक्टरची टंचाई (semiconductor shortage) निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन कार घरी येण्यासाठी चार ते पाच महिन्याची प्रतिक्षा करावी लागेल. सध्या कार खरेदीची प्रतिक्षा यादी वाढली आहे. कारच्या उत्पादनातील महत्वाचा घटक असलेल्या ७५ हजार रूपये किंमतीच्या चिपचा तुटवडा असल्याने देशात हाहाकार माजविला आहे.
टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर उघडलेल्या बाजाराचा अंदाज घेण्यात कंपन्या अपयशी ठरल्या. महामारीमुळे नागरिक वाहने खरेदी करणार नाहीत, असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यामुळे कंपन्यांनी सेमिकंडक्टरची मागणीही कमीच केली होती. मात्र, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर खासगी वाहनाच्या मागणीत अचानकच वाढ झाली. अनपेक्षितपणे मागणी वाढल्याने कंपन्यांची पूर्वतयारी व अंदाजच चुकले. त्यामुळे ग्राहकांची प्रतीक्षा यादीत वाढच होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी सेमीकंडक्टर सर्वात महत्त्वाचे उपकरण आहे. क्रिस्टीलाईज सिलिकॉनवर प्रक्रिया करून सेमीकंडक्टर तयार करण्यात येते. त्याचा वापर वाहनांमध्ये करण्यात येतो. भारतात सेमिकंडक्टरची आयात जपान, चीन, तायवान आणि जर्मनीतून होते.
कार विक्री घटणार -
अमेरिकन राज्यात टेक्सासमध्ये फेब्रुवारी महिन्यात बर्फाचे तुफान आले होते. त्यामुळे तेथील सेमीकंडक्टर उत्पादन करणाऱ्या कंपन्या बंद होत्या. तसेच जपानमध्येही उत्पादन थंडावले होते. त्यात कारची मागणीही अचानक वाढली. विक्रीत २० ते २५ टक्के वाढ झाली. आता कारमध्ये वापरण्यात येणाऱ्या सेमिकंडक्टरची टंचाई जाणवू लागली आहे. काही कंपन्यांनी कारचे उत्पादनही कमी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.