PF खातेदारांसाठी अलर्ट; 'या' तारखेआधी ई-नॉमिनेशन करणे बंधनकारक

EPFO
EPFO esakal
Updated on

पीएफ खातेधारकांसाठी (PF Account Holder) 31 डिसेंबर रोजी एक मुदत संपत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ​​ने सर्व पीएफ खातेधारकांना त्यांच्या पीएफ खात्यासाठी (PF Account) नॉमिनी अॅड (Nominee) करणे अनिवार्य केले आहे. हे काम 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण न झाल्यास पीएफ खातेधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) ने हे काम पीएफ खातेधारकांना सुरक्षा देण्यासाठी केले आहे. पीएफ (Provident Fund) खातेधारकांसोबत जर काही अनुचित प्रकार घडल्यास, नॉमिनी असलेल्या व्यक्तीला विमा आणि पेन्शन सारखे फायदे मिळतात. अलीकडेच EPFO ​​ने म्हटले होते की, EPFO सदस्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी ई-नॉमिनेशन च्या सुविधेचा लाभ घ्यावा. भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि विमा सेवांचा ऑनलाइन लाभ घेण्यासाठी तुमचे ई-नॉमिनेशन (E-Nomination) दाखल करा. आपली पत्नी, मुले आणि पालकांची काळजी घेण्यासाठी आणि ऑनलाइन पीएफ , पेन्शन (Pension) आणि विम्याद्वारे त्यांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहकाने ई-नॉमिनेशन दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

EPFO
डिसेंबरमध्ये डिस्काउंट ऑफरवर नवी कार घेताय? जाणून घ्या फायदे-तोटे

एकापेक्षा जास्त नॉमिनींचे नावे अॅड करा

पीएफ खातेधारक नॉमिनी जोडण्याचे काम ऑनलाइन देखील करू शकतात. ईपीएफओ ही सुविधा देते की पीएफ खातेधारक एकापेक्षा जास्त नॉमिनीचे नाव जोडू शकतात. याशिवाय, खातेदार नॉमिनी व्यक्तीला मिळणारा हिस्सा देखील ठरवू शकतात.

नॉमिनी असे जोडता येतील

  • सर्व प्रथम EPFO ​​ची अधिकृत वेबसाइट उघडा.

  • यानंतर आता तुम्हाला UAN आणि पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल.

  • त्यापुढे मॅनेज सेक्शनमध्ये जा आणि ई-नॉमिनेशन लिंकवर क्लिक करा.

  • आता नॉमिनीचे नाव आणि इतर तपशील भरा.

  • एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडण्यासाठी Add New बटणावर क्लिक करा.

  • यानंतर Save Family Details वर क्लिक करताच ही प्रक्रिया पूर्ण होईल.

EPFO
एक लिटर पेट्रोलमध्ये धावतात 26 किमी; पाहा देशातील टॉप मायलेज कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.