Ganesh Chaturthi Festival 2024 : यंदाच्या गणेशोस्तव अधिक सुरक्षित अन् प्रकाशमय; महावितरणने मंडळांना केले आवाहन
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांभिर्याने उपाय योजना कराव्यात, वीजपुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उत्सवांसाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजपुरवठ्याच्या दराने वीज देण्यात येणार आहे. त्यामुळे अनधिकृत वीजजोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, या उत्सवांकरिताच्या मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी, असे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळ कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.
तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक मंडळांनी २४ तास सुरू असणारे मोफत क्रमांक १९१२, १९१२०, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ यावर संपर्क साधावा. याशिवाय सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यात मोठया प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना सणांचा आनंद घेता यावा, यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणुकीतील देखाव्याचा परिसरातील विदयूत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहीत झाल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांत वीज सुरक्षेला प्रथम प्राधान्य द्यावे, असेही महावितरणद्वारे कळविण्यात आले आहे.
विजेचे विघ्न टाळणे गरजेचे
विघ्नहर्ता श्रीगणेशाचा उत्सव आनंदाने साजरा होत असताना त्यात विजेमुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी अर्थातच विजेचे विघ्न टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी वीजपुरवठ्यासंदर्भात निष्काळजीपणा बाळगल्यास मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून विजेसंदर्भात गणेश मंडळांनी सावध राहण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.