EV Course : आता आला EV चा कोर्स! प्रशिक्षणासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांत नवा अभ्यासक्रम

मॉरीस गराजेससोबत या अभ्यासक्रमासाठी हातमिळवणी करण्यात आली आहे. याद्वारे ईलेक्ट्रिक व्हेइकल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
EV Course
EV Coursegoogle
Updated on

मुंबई : ईलेक्ट्रिक आणि संमिश्र प्रकारच्या वाहनांना मागणी वाढत असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची गरजही वाढत आहे. त्यामुळे बंगळुरूच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी या विषयावरील अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांशी हातमिळवणी करून ईव्ही क्षेत्राशी संबंधित अल्पावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. (EV technology engineering course opportunities in electric vehicle field) हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

EV Course
Safe Motherhood : सुरक्षित मातृत्वासाठी गर्भधारणेपूर्वी या गोष्टी तपासून घ्या

मॉरीस गराजेससोबत या अभ्यासक्रमासाठी हातमिळवणी करण्यात आली आहे. याद्वारे ईलेक्ट्रिक व्हेइकल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा ५ महिन्यांचा अभ्यासक्रम असून यात ६० दिवसांच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल. मॉरीस गराजेसमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप दिली जाणार आहे.

सिस्टिम मोड्युल, ई लर्निंग, हाय व्होल्टेज सिस्टिम अॅण्ड मेझरमेण्ट्सबाबत जागरूकता, हाय व्होल्टेज कारचा सराव, एचव्ही टेस्ट बेन्चवर सिम्युलेशन आणि मॉडेलिंग यांचा समावेश आरसीव्हीई मर्सिडिझ बेन्झ कोर्सच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

अॅडव्हान्स डिप्लोमा इन ऑटोमेटिव्ह मेकॅट्रॉनिक्स असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. सर्व्हिस इंजिनिअर, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च आणि डेव्हलपमेंट स्कील्स अशा विविध भूमिकांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

EV Course
Sachin Tendulkarच्या आलिशान घराचे हे फोटो पाहिलेत का ?

हे प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना १२ ते १६ लाख वार्षिक उत्पन्नाच्या नोकऱ्या मिळू शकतात. पर्यावरणस्नेही वाहतुकीसाठी ईव्हीची भूमिका मोठी असणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज निर्माण होत आहे.

चार्जेबल आणि बॅटरीवर चालणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()