नवी दिल्ली : कुठलंही सरकार काम करायचं म्हटलं की, 'आधार कार्ड' आलंच! आधार कार्डाशिवाय कुठलंच काम आता होत नाही, इतकं नक्की. आपल्या मोबाईलच्या साध्या सिमकार्ड खरेदी पासून ते आता अगदी कोरोना लसीकरणापर्यंत 'आधार कार्ड'च आपल्याला आधार ठरतं. कुठलीही सरकारी योजना आधार कार्डाशिवाय पूर्णच होत नाही. आधार कार्ड म्हणजे आपली अधिकृत ओळख असते. ठिकठिकाणी आपल्याला आधार कार्ड लागतंच! ते जर हरवलं अथवा गहाळ झालं तर आपली बरीचशी आवश्यक अशी कामे निश्चितपणे अडतात. या आधार कार्डमध्ये काही चुका असल्या तरीही बराच घोळ होतो. एखाद्या ठिकाणी कागदोपत्री कामासाठी गेल्यास त्याठिकाणी आपले आधार कार्ड नसेल तर मोठा खोळंबा होतो. मात्र, आता या सगळ्याच तक्रारी दूर होण्याच्या मार्गावर आहेत. चुटकीसरशी यातली एक नि एक तक्रार आता दूर होणार आहे. या सगळ्याच समस्या आपण घरबसल्या कुठेही न जाता सहजपणे सोडवू शकणार आहोत. याचं कारण आहे mAadhaar App! हे ऍप जर आपल्याकडे नसेल तर ते आत्ताच डाऊनलोड करा. जर ते आधीपासूनच असेल तर ते अपडेट करा. कारण आता या ऍपचे नवे अपडेट आपला वेळ वाचवणारं ठरणार आहे.
UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट आणले आहे. या अपडेटमुळे अनेक गोष्टी सहजसोप्या होणार आहेत. मात्र, हे ऍप घेताना आपल्याला बनावट आणि खोट्या ऍप्सपासून सावधान राहणं गरजेचं आहे. हे ऍप कुठूनही डाऊनलोड करु नका. ते डाऊनलोड करण्यासाठी UIDAI ने दिलेल्या अधिकृत लिंकवरुनच आधारचे हे खरे ऍप आपल्याला डाऊनलोड करता येईल.
या ऍपद्वारे तुम्ही तुमच्या फोनवर आधार कार्डची कॉपी डाऊनलोड करु शकता
या ऍपमध्येआधारच्या री-प्रिंटचा ऑप्शन देखील आहे.
या ऍपद्वारे, गरज भासल्यास आपण ऑफलाइन मोडमध्ये देखील आधार दाखवू शकता. याचा अर्थ आपल्याला आपल्या आधारची कोणतीही प्रत संपूर्ण वेळ सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही.
कोणत्याही कागदपत्रांशिवाय पत्ता देखील अपडेट करता येईल.
तुमच्या कुटुंबातील 5 व्यक्तींचे आधार कार्ड तुम्ही या ऍपमध्ये ठेवू शकतो.
या ऍपद्वारे आधार कार्ड धारक कधीही त्यांचा UID किंवा आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करू शकतात. ग्राहकांची सुरक्षितता ध्यानात घेऊनच हे फीचर या अॅपमध्ये देण्यात आले आहेत. याचं कारण म्हणजे प्रत्येकाचा बायोमेट्रिक डेटा आधारशी जोडला गेला आहे, जो अर्थातच फार महत्वाचा आहे.
या ऍपमध्ये देण्यात आलेल्या बायोमेट्रिक लॉकिंग सिस्टमचा वापर करून, आधार लॉक होईल आणि आपण तो अनलॉक करेपर्यंत त्याचा वापर करता येणार नाही.
या अॅपद्वारे क्यूआर कोड आणि ईकेवायसी डेटा शेअर केला जाऊ शकतो.
या अॅपद्वारे तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्राची माहिती देखील सहज मिळू शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.