इंस्टाग्राम लहानांसाठी धोकादायक, फेसबुकलाही हे आहे माहिती

इंस्टाग्राम लहानांसाठी धोकादायक, फेसबुकलाही हे आहे माहिती
Updated on
Summary

इंस्टाग्राम हे स्वतः फेसबुकच्या मालकीचे फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप आहे.

जर तुमची मुले सुद्धा इंस्टाग्राम वापरत असतील तर तुम्हाला खूप सतर्क राहण्याची गरज आहे. याचे कारण असे की, इंस्टाग्राम मुलांना मानसिकरित्या आजारी बनवत आहे आणि ते नैराश्याला बळी पडत आहेत. फेसबुकच्या अंतर्गत अभ्यासात हे उघड झाले आहे. इंस्टाग्राम हे स्वतः फेसबुकच्या मालकीचे फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, फेसबुक अभ्यासात असे आढळून आले आहे की, इंस्टाग्राम अ‍ॅप किशोरवयीन मुलांसाठी हानिकारक आहे. जर्नलने फेसबुकच्या मागील तीन वर्षांच्या अभ्यासाचा हवाला दिला की, इंस्टाग्राम आपल्या यंग यूजर्सवर कसा परिणाम करत आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रभावित तरुण मुली आहेत. फेसबुक रिपोर्टनुसार, इंस्टाग्राम लहान मुलांवर अशा प्रकारे परिणाम करत आहे की, त्यांना आत्महत्येचे विचार येऊ लागतात. सुमारे 13 टक्के ब्रिटिश यूजर्स आणि 6 टक्के अमेरिकन यूजर्संनी इंस्टाग्रामवर सर्च केला आहे.

इंस्टाग्राम लहानांसाठी धोकादायक, फेसबुकलाही हे आहे माहिती
भारतासह जगभरात इन्स्टाग्राम डाउन; वापरकर्त्यांची सोशल मिडियावर तक्रार

फेसबुकला असेही आढळले आहे की, अमेरिकेतील 14 टक्के मुलांनी सांगितले की इंस्टाग्राममुळे त्यांना स्वतःबद्दल वाईट वाटले आहे. सोशल मीडिया कंपनीने सर्वात हानिकारक म्हणून ओळखले गेलेले एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मेकअप. म्हणजेच, लहान मुलांना इंस्टाग्रामवर सुंदर दिसावे आणि तसे झाले नाही तर ते उदास होतात. इंस्टाग्राम प्रत्येक 3 मुलींपैकी 1 मध्ये बॉडी इमेजच्या समस्या वाढवते.

अहवालानुसार, संशोधकांनी इंस्टाग्रामच्या एक्सप्लोर पेजला इशारा दिला आहे की, यूजर्सं विविध खात्यांमधून पोस्ट क्युरेट करतात. यूजर्सं ना अशा गोष्टींकडे आकर्षित करणे जे त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते. अ‍ॅपमध्ये फक्त चांगले फोटो आणि लगेच पोस्ट करण्याचे फिचर्स जी तरुणांसाठी एक प्रकारचे व्यसनाप्रमाणे आहे.

इंस्टाग्राम लहानांसाठी धोकादायक, फेसबुकलाही हे आहे माहिती
इन्स्टाग्राम, फेसबुकने उडवून टाकली राहुल गांधींची 'ती' पोस्ट

लहान मुलांसाठी इंस्टाग्रामचे नवीन व्हर्जन तयार केले जाईल

फेसबुकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संशोधनाचा आढावा घेतला आहे. गेल्या वर्षी सीईओ मार्क झुकरबर्गला दिलेल्या सादरीकरणात याचा उल्लेख करण्यात आला होता. तरीसुद्धा, फेसबुकने युजर्संना प्लॅटफॉर्मवर गुंतण्यासाठी आणि भेट देण्यासाठी आकर्षित करणे सुरू ठेवले आहे.

13 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी फेसबुक इंस्टाग्रामचे व्हर्जन देखील बनवत आहे. अलीकडेच असे वृत्त आले की, फेसबुक इंस्टाग्रामच्या नवीन व्हर्जनवर काम करत आहे, जे केवळ 13 वर्षांखालील मुलांसाठी असेल. इंस्टाग्रामचे नवीन व्हर्जन किशोर मुलांसाठी सुरक्षित अनुभव घेऊन येईल असे कंपनीने म्हटले होते.

इंस्टाग्राम लहानांसाठी धोकादायक, फेसबुकलाही हे आहे माहिती
ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम दोन दिवसांत ब्लॉक होणार?

कंपनीने टीनएजर्स साठी एक नवीन पॉलिसी सादर केली आहे.

इंस्टाग्राम मुलांच्या संरक्षणासाठी गंभीर पावले उचलत आहे. अलीकडेच, कंपनीने टीनएजर्स यांना अज्ञात आणि संशयास्पद प्रौढांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक कडक सुरक्षा उपाय देखील केले आहेत. इंस्टाग्रामने नवीन धोरणे सादर केली आहेत, जे प्रौढ युजर्सं यांना टीनएजर्संच्या संपर्कात राहणे अवघड करेल जर ते टीनएजर्स यांचे पालन करत नसतील तर प्रौढ युजर्सं यांच्या संशयास्पद वर्तनाबद्दल सतर्क (अलर्ट) करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.