Meta Global Outage : फेसबुक-इन्स्टा बंद पडल्यामुळे मार्क झुकरबर्गचं अब्जावधींचं नुकसान.. नेमका आकडा किती?

Facebook Down : मंगळवारी रात्री अचानक जगभरातील कित्येक फेसबुक यूजर्सचे अकाउंट लॉग-आऊट झाले होते. तर इन्स्टाग्रामवर फीड रिफ्रेश करणे आणि इतर गोष्टींना अडचण येत होती.
Meta Global Outage
Meta Global OutageeSakal
Updated on

Meta Global Outage Mark Zuckerberg Loss : मंगळवारी रात्री काही तासांसाठी मेटाचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद पडले होते. जगभरातील यूजर्सना फेसबुक, इन्स्टा आणि थ्रेड्सवर लॉगइन करण्यास अडचण येत होती. काही काळासाठी व्हॉट्सअ‍ॅप देखील बंद पडलं होतं. काही तासांनी ही सेवा सुरळीत झाली, मात्र तोपर्यंत मेटाचं अब्जावधींचं नुकसान झालं होतं.

या ग्लोबल आउटेजमुळे मेटा आणि मार्क झुकरबर्गला (Mark Zuckerberg) जगभरातून ट्रोल करण्यात आलं. मात्र, सोबतच कंपनीचं आर्थिक नुकसानही झालं. मेटाच्या तीनही मोठ्या सोशल साईट्स बंद असल्याच्या बातम्या येऊ लागताच कंपनीच्या शेअरची प्राईज 1.5 टक्क्यांनी खाली गेली. (Meta Share Price)

मंगळवारी अमेरिकेतील शेअर मार्केट बंद होताना मेटाच्या शेअरची किंमत 1.6 टक्क्यांनी खालीच होती. यामुळे मार्क झुकरबर्गचं सुमारे 100 मिलियन डॉलर्सचं नुकसान झालं असू शकतं, असं मत वेडबुश सिक्युरिटीजचे मॅनेजिंग डिरेक्टर डॅन आयव्हिस यांनी डेली मेलशी बोलताना व्यक्त केलं. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा तब्बल 8 अब्ज रुपयांहून अधिक होतो. (Mark Zuckerberg Loss due to Outage)

Meta Global Outage
Facebook Down : फेसबुक-इन्स्टा अन् यूट्यूबही डाऊन, मस्कसोबत सगळ्यांनीच केलं मेटाला ट्रोल.. काल रात्री काय काय घडलं?

'एक्स'वर दिली माहिती

मंगळवारी रात्री अचानक जगभरातील कित्येक फेसबुक यूजर्सचे अकाउंट लॉग-आऊट झाले होते. तर इन्स्टाग्रामवर फीड रिफ्रेश करणे आणि इतर गोष्टींना अडचण येत होती. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजही जात नसल्याची तक्रार कित्येक यूजर्सनी केली होती. मेटाचे अधिकारी अँडी स्टोन यांनी आपल्याला या अडचणींची कल्पना असल्याची माहिती चक्क 'एक्स' पोस्ट करुन दिली. सुमारे दोन तासांनंतर मेटाच्या सर्व सेवा सुरळीत झाल्या होत्या. (Meta Global Outage)

यापूर्वी 2021 साली देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना टेक्निकल ग्लिचचा सामना करावा लागला होता. त्या वेळी तब्बल सात तासांसाठी सर्व सोशल मीडिया साईट्स बंद होत्या. यावेळी मात्र दोन तासांमध्येच सर्व सेवा पूर्ववत झाल्या. या ग्लोबल आउटेजचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()