Facebook वापरकर्त्यांसाठी महत्वाचे! 'हे' काम लगेच करा अन्यथा..

facebook is locking users who didnt activate facebook protect know how to turn on
facebook is locking users who didnt activate facebook protect know how to turn on
Updated on

मेटा कंपनीच्या मालकीच्या Facebook या प्रसिध्द प्लॅटफॉर्मद्वारे एक नवीन सेफ्टी फीचर देण्यात आले आहे, जे Facebook Protect म्हणून ओळखले जाते. फेसबुकचे म्हणणे आहे की, हा एक सुरक्षा फीचर आहे, जो यूजर्सचे फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवण्यास मदत करते. हे फीचर खास अशा लोकांसाठी आणले गेले आहे, जे हॅकर्सचे लक्ष्य बनू शकतात. यामध्ये पत्रकार, सरकारी कर्मचारी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांसारख्या लोकांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, Facebook ने Facebook Protect फीचर टेस्ट करुन ते जागतिक स्तरावर लॉंच करण्यात आले होते. ज्यांना 17 मार्चच्या अंतिम मुदतीपर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसह फेसबुक प्रोटेक्ट सक्रिय करणे आवश्यक होते, पण ज्यांनी ते केले नाही अशा काही वापरकर्त्यांचे फेसबुक अकाउंट लॉक करत आहे.

हे Facebook Protect फीचर विशेषत: Facebook खाते बंद करत आहे ज्यांनी Facebook Protect चालू केलेले नाही. काही काळापूर्वी कंपनीने फेसबुक प्रोटेक्ट चालू करण्यासाठी काही यूजर्सना मेल पाठवले होते. परंतु बहुतेक वापरकर्त्यांनी हा मेल स्पॅम समजून हे फीचर सुरू केले नाही. अशा युजर्सचे फेसबुक अकाउंट बंद केले जात आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा युजर्स फेसबुक प्रोटेक्ट फीचर ऑन करतील तेव्हा ही खाती त्याच स्थितीत सक्रिय होतील.

facebook is locking users who didnt activate facebook protect know how to turn on
Apple Watch ने वाचवला वापरकर्त्याचा जीव; 'हे' खास फीचर ठरलं जीवनदायी

फेसबुक प्रोटेक्ट कसे चालू करावे

तुम्ही Facebook Protect चालू केले नसेल, तर तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून ते चालू करू शकता.

  • यूजर्सला सर्वात आधी फेसबुक अकाउंटच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.

  • जिथे तुम्हाला सुरक्षा आणि लॉगिनचा पर्याय मिळेल.

  • त्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला लिस्टमध्ये फेसबुक प्रोटेक्ट दिसेल.

  • त्यावर क्लिक करून, तुम्ही स्क्रीनवरील स्टेप्स फॉलो करून ते चालू करू शकता.

  • अशा प्रकारे तुमचे फेसबुक प्रोटेक्ट फीचर चालू होईल.

  • त्यानंतर फेसबुक अकाऊंट वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

facebook is locking users who didnt activate facebook protect know how to turn on
Jio चे दोन नवीन WFH प्लॅन, दररोज 2.5GB डेटासह मिळतील 'हे' फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.