फेसबुकला 18 वर्षात पहिल्यांदच झटका! गमावले 10 लाख डेली यूजर्स

facebook reported decline in daily active users for first time loses 1 million daily users marathi news
facebook reported decline in daily active users for first time loses 1 million daily users marathi news
Updated on

Facebook ला कमी होत असलेल्या युजर्समुळे तोटा सहन करावा लागत आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा (Meta) ने युजर्सची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम झाल्याचे जाहीर केले आहे. याचा थेट परिणाम कंपनीकडून मिळणाऱ्या जाहिरातींवरही होणार आहे. त्यांना 18 वर्षांत पहिल्यांदाच खूप मोठे नुकसान झाले असून मेटाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, त्याच्या वापरकर्त्यांची संख्या सतत कमी होत आहे. मेटाने जारी केलेल्या या निवेदनानंतर कंपनीचे शेअर्स तब्बल 22 टक्क्यांनी घसरले.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कंपनीचा नफा 10.3 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 77,106 कोटींनी कमी होऊ शकतो. तसेच, गेल्या तिमाहीत दररोज 1 मिलीयन एक्टिव्ह यूजर्स कमी झाले आहेत, ज्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मेटाच्या या विधानानंतर, कंपनीचे बाजार मूल्य 200 बिलियन डॉलरने कमी झाली आहे.

कंपनीला मागील तिमाहीपासून 1.95 बिलियन डेली ॲक्टिव्ह यूजर्स अपेक्षित होते परंतु ही संख्या 1.93 बिलियनवर थांबली आहे. त्याच्या अंदाजानुसार, Meta ने $ 33.67 बिलियन किंवा सुमारे 2,52,051 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. चौथ्या तिमाहीत, Meta ने $10.3 बिलियन ( सुमारे 77,106 कोटी) चा निव्वळ नफा नोंदवला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्के कमी आहे.

facebook reported decline in daily active users for first time loses 1 million daily users marathi news
Jio vs Vi : दररोज 3GB डेटा देणारा कोणाचा प्लॅन आहे बेस्ट?

Apple कंपनींमुळे त्यांना सतत नुकसान होत असल्याचे मेटाने एका निवेदनात म्हटले आहे. खरं तर, गेल्या वर्षी Apple ने प्रायव्हसी फीचर जारी केले होते, त्यानंतर कोणतेही अॅप वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय फोनमध्ये एक्सेस मिळवू नाही. या फीचरमुळे आयफोन वापरकर्त्यांना त्यांच्या डेटावर अधिक नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे फेसबुक ते ट्रॅक करु शकत नाही, ज्यामुळे फेसबुकच्या जाहिरातींवर परिणाम होतो.

facebook reported decline in daily active users for first time loses 1 million daily users marathi news
रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.