Look Who Died : फेसबुकवर स्कॅम करण्याची नवी पद्धत आली समोर, कशी घ्याल खबरदारी?

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालेल्या या स्कॅमची भारतातही काही प्रकरणं दिसून आली आहेत.
Look Who Died Scam
Look Who Died ScamEsakal
Updated on

लोकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स नेहमी नवनवीन पद्धती शोधत असतात. अशातच आता फेसबुकवर होणारं एक स्कॅम समोर आलं आहे. 'लुक हू डाईड' असं या स्कॅमला म्हटलं जातंय. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालेल्या या स्कॅमची भारतातही काही प्रकरणं दिसून आली आहेत. या माध्यमातून कित्येक लोकांचा डेटा चोरी झालेला आहे.

अशी करतात शिकार

यासाठी हॅकर्स एखादी फेक फेसबुक प्रोफाईल तयार करतात. ही प्रोफाईल बऱ्याच वेळा तुमच्या मित्रयादीतील एखाद्या व्यक्तीच्या नावाने असू शकते. यानंतर हे हॅकर्स तुम्हाला 'लुक हू डाईड', म्हणजेच बघ कोणाचा मृत्यू झाला अशा आशयाचा मेसेज पाठवतात. या मेसेजसोबत एक बातमीच्या लिंकसारखी दिसणारी लिंक असते.

Look Who Died Scam
SpinOK Virus : तब्बल १०० हून अधिक अ‍ॅप्समध्ये मिळाला हा व्हायरस, फोनमध्ये आला की विषयच संपला!

असा मेसेज आल्यानंतर कुतूहलाने लोक त्या लिंकवर क्लिक करतात. याठिकाणी मग पुढे फेसबुक यूजरनेम आणि पासवर्ड मागितला जातो. टेक्नॉलॉजीबाबत जास्त माहिती नसणारे लोक याला बळी पडतात, आणि बातमी वाचण्यासाठी आपले लॉग-इन क्रेडेन्शिअल्स भरून टाकतात.

या माध्यमातून हॅकर्सना तुमच्या फेसबुक लॉग-इनची सर्व माहिती मिळते, आणि तुमचं अकाउंट ते आरामात उघडू शकतात. यानंतर तुमच्या अकाउंटच्या माध्यमातून ते तुमच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांना तसाच मेसेज पाठवतात, आणि ही चेन वाढत जाते.

आर्थिक फटका

या स्कॅमच्या माध्यमातून कित्येक लोकांना आर्थिक फटकाही बसला आहे. ऑस्ट्रेलियातील स्कॅमवॉच कंपनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, देशात २०२३ साली आतापर्यंत सुमारे ११.५ मिलियन डॉलर्सची फसवणूक झाली आहे. तर, यूकेमध्ये दर सात मिनिटांना एक व्यक्ती ऑनलाईन शॉपिंग किंवा सोशल मीडिया घोटाळ्याची शिकार होते.

Look Who Died Scam
Tech Hacks : हॅकर्स स्वप्नातही चोरू शकणार नाही तुमचा फेसबुक डेटा! वापरा फक्त ही सोपी ट्रिक

अशी घ्या खबरदारी

तुमच्यासोबतही असा स्कॅम होऊ नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी फॉलो करू शकता -

  • सोशल मीडिया किंवा ईमेल लॉगइनसाठी मजबूत पासवर्ड किंवा टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा वापर करा.

  • कोणत्याही प्रकारच्या संशयित लिंकवर क्लिक करू नका.

  • मित्रांकडून असे मेसेज आल्यास लिंक उघडण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा करून याबाबत विचारणा करा.

  • तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर आणि टूल्स अपडेट ठेवा.

इतर माध्यमातूनही शक्य

केवळ फेसबुकच नाही, तर मेसेजिंगच्या इतर माध्यमांमधूनही अशा प्रकारचा स्कॅम होणं शक्य आहे. टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम अशा माध्यमांचा यात समावेश आहे.

Look Who Died Scam
Tax SMS Scam : सावधान! इन्कम टॅक्स रिटर्न भरताना केलेली ही चूक महागात पडेल, लुटारू टोळीची नजर तुमच्यावर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.