Facebook चा आणखी एक महत्वाचा निर्णय, 'हे' फिचर होणार बंद

Mark Zuckerberg
Mark Zuckerberg e sakal
Updated on

फेसबुकने (Facebook) नुकतेच कंपनीचे नाव बदलले असून कंपनीचा विस्तार करणार असल्याचं म्हटलं आहे. आता मंगळवारी पुन्हा एक नवीन घोषणा करण्यात आली असून फेसबुकवरील ''फेस रिकग्नीशन सिस्टम'' (Face Recognition system) बंद करण्यात येणार आहे. याचाच अर्थ आता फेसबुकवर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यामध्ये कोण दिसतंय हे आपोआप ओळखून त्यांना टॅग करण्यासाठीचे नोटीफिकेशन बंद होणार आहे.

Mark Zuckerberg
Facebook च्या माजी कर्मचाऱ्याकडून झकरबर्गच्या राजीनाम्याची मागणी

जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे हे फिचर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण, फेसबुकवर नियामक आणि कायदेतज्ज्ञांकडून युजर्सच्या सुरक्षेबद्दल मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यानंतर फेसबुकने हा निर्णय घेतला आहे. पण, या फिचर बंद करण्यावरून अनेकांनी टीका देखील केली आहे. कारण हे फिचर किरकोळ विक्रेते, रुग्णालये आणि इतर व्यवसायांमध्ये सुरक्षिततेच्या उद्देशाने लोकप्रिय आहे.

फेसबुकने हे फिचर आणलं तेव्हा फोटो अपलोड केल्यानंतर आपोआप टॅगिंग सुरू झालं. त्यानंतर युजर्सला त्याचं नोटीफिकेशन येते. कारण, या सर्व युजर्सने हे फिचर वापरण्यासाठी परवानगी दिलेली असते. सध्या फेसबुकवर दररोज सक्रीय असलेल्या एक तृतीयांश पेक्षा अधिक युझर्सने या फिचरला परवानगी दिली आहे. पण, आता १ अब्जाहून अधिक लोकांनी वापरलेले हे फिचर हटविण्यात येणार आहे. जागतिक पातळीवर हे काम केले जात असून येत्या डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

'या'वेळी वापरता येणार फिचर -

हे तंत्रज्ञान आता काही सेवांपुरते मर्यादीत असेल. तुमचं फेसबुक अकाउंट लॉक झालं असेल आणि त्याला पुन्हा सुरू करायचं असेल तर या फिचरचा वापर करण्याची परवानगी तुम्हाला दिली जाईल, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने फेसबुक ब्लॉगमध्ये सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.