Wedding Invitation Scam : हे काय नवीन! लग्नाच्या आमंत्रणाखाली लाखोंचा गंडा; चर्चेत असलेलं ऑनलाइन फ्रॉडचं नवं प्रकरण काय?

Wedding Invitation Online Scam Cyber Fraud : डिजिटल तंत्रज्ञानामुळे नातेवाईकांना आमंत्रण देण्यासाठी ई-आमंत्रणे पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. अश्यात लग्नाच्या आमंत्रणातून सायबर फ्रॉड झाल्याची घटना समोर आली आहे.
Wedding Invitation on Whatsapp Online Scam Cyber Fraud
Wedding Invitation on Whatsapp Online Scam Cyber Fraudesakal
Updated on

Wedding Invitation Online Fraud : भारतामध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे, आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे नातेवाईकांना आमंत्रण देण्यासाठी ई-आमंत्रणे पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या सुविधेसोबतच काही धोकेही येतात. सायबर गुन्हेगारांनी सध्या बनावट लग्न आमंत्रणाच्या माध्यमातून डेटा चोरीचा नवा मार्ग शोधला आहे. एका साध्या वाटणाऱ्या लिंकवर क्लिक केल्याने तुमचा फोन हॅक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे तुमचे सर्व वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो.

लग्नाचे फसवे आमंत्रण

हिमाचल प्रदेश पोलिसांनी या नव्या फसवणुकीबाबत नागरिकांना सतर्क केले आहे. गुन्हेगार WhatsApp वर बनावट लग्न आमंत्रणाच्या नावाने मालवेअर असलेली फाईल पाठवतात. हे आमंत्रण e-कार्ड म्हणून भासवले जाते, ज्यात एक APK फाईल असते. वापरकर्ता एकदा ही फाईल डाउनलोड केल्यावर त्यांच्या डिव्हाईसमध्ये मालवेअर इन्स्टॉल होते, ज्यामुळे हॅकर्सला तुमच्या फोनमधील डेटा पाहण्याची, मेसेजेस पाठविण्याची आणि पैसे उकळण्याची संधी मिळते.

Wedding Invitation on Whatsapp Online Scam Cyber Fraud
Vivo Y300 5G Launch : एक झलक सबसे अलग! लवकरच लाँच होतोय Vivo Y300 5G; बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फीचर्सवाला फोन, एकदा बघाच

काय आहे फसवणूक?

सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा फसवणूक प्रकार एक अज्ञात क्रमांकावरून येणाऱ्या WhatsApp संदेशाद्वारे सुरू होतो. हे संदेश साधारणपणे तुमच्या नातेवाईकाकडून पाठविण्यात आले आहे असे भासवले जाते. त्यामध्ये एक अटॅचमेंट असते जी सामान्य फाईल वाटते, परंतु ती एक हानिकारक APK फाईल असते. एकदा वापरकर्त्याने ही फाईल डाउनलोड केली की, तेव्हा त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या डेटावर ताबा मिळवण्यासाठी मालवेअर अॅप इन्स्टॉल होते.

सावधगिरीचे आवाहन

हिमाचल प्रदेश सायबर पोलिसांनी नागरिकांना अज्ञात क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही व्हाट्सअॅप मेसेजमधून आलेल्या फाईल्स डाउनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे, विशेषत: APK फाईल्स, कारण या फाईल्समध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. हिमाचल प्रदेश सायबर क्राइम विभागाचे DIG मोहित चावला यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, "अज्ञात क्रमांकावरून आलेली कोणतीही फाईल डाउनलोड करू नका, आधी त्याची सत्यता तपासा."

Wedding Invitation on Whatsapp Online Scam Cyber Fraud
Social Media Ban : हे काय नवीन! 16 वर्षांच्या आतील मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट होणार बंद, या सरकारचा मोठा निर्णय

सायबर फसवणुकीपासून बचाव कसा करावा?

जर तुम्ही अशा फसवणुकीचे शिकार झालात, तर तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर कॉल करून किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. याशिवाय, त्वरित बँक खात्यांचे तपशील बदलणे किंवा डेटा संरक्षणासाठी उपयुक्त पद्धती वापरणे आवश्यक आहे.

डिजिटल युगात सुरक्षितता

सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापासून आणि संशयास्पद फाईल्स डाउनलोड करण्यापासून दूर राहा. ऑनलाइन संवादांची सत्यता तपासणे आणि संशयास्पद संदेश आले तरी ते पूर्णतः खात्री करूनच उघडणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.