Dating Apps : 'व्हॅलेंटाईन्स डे'पर्यंत मिळवायचीये डेट? भारतातील प्रसिद्ध डेटिंग अ‍ॅप्सची घेऊ शकता मदत; पाहा यादी

Valentine's Week : तुम्ही जर सिंगल असाल, आणि व्हॅलेंटाईन्स डे दिवशी आपल्याही सोबत कोणीतरी असावं असं तुम्हाला वाटत असेल; तर तुम्ही डेटिंग अ‍ॅप्सची मदत घेऊ शकता.
Dating Apps
Dating AppseSakal
Updated on

Top Dating Apps in India : फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना समजला जातो. सध्या व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे, आणि सगळीकडे कपल्स एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अशात तुम्ही जर सिंगल असाल, आणि व्हॅलेंटाईन्स डे दिवशी आपल्याही सोबत कोणीतरी असावं असं तुम्हाला वाटत असेल; तर तुम्ही डेटिंग अ‍ॅप्सची मदत घेऊ शकता. भारतात लोकप्रिय असणाऱ्या टॉप 10 डेटिंग अ‍ॅप्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

टिंडर

टिंडर हे डेटिंग अ‍ॅप संपूर्ण जगभरात फेमस आहे. या अ‍ॅपवर दररोज 26 मिलियन पेक्षा अधिक मॅच होतात असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. भारतातील कित्येकांना टिंडरवरुन आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे.

बम्बल, हिंज

बम्बल आणि Hinge हे दोन डेटिंग अ‍ॅप्सदेखील भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. आपल्या प्लॅटफॉर्मवरील फेक प्रोफाईल आणि स्कॅम रोखण्यासाठी बम्बलने काही दिवसांपूर्वीच एक एआय फीचर लाँच केलं आहे. यामुळे हे अ‍ॅप अधिक सुरक्षित झालं आहे.

Dating Apps
Bumble Fake Account : ऑनलाईन डेटिंग होणार अधिक सुरक्षित! फेक, स्पॅम प्रोफाईल हटवण्यासाठी बम्बल घेतंय एआयची मदत..

हॅपन, आईल

Happn आणि Aisle हे अ‍ॅप्स चौथ्या अन् पाचव्या नंबरला येतात. या डेटिंग अ‍ॅप्समध्ये तुमच्या लोकेशननुसार जवळच्या प्रोफाईल्स दिसतात. यामुळे तुम्ही मॅच झालेल्या व्यक्तींना भेटून डेटवरही जाऊ शकता.

यानंतर भारतात Bado, OKCupid, True Madly, Woo आणि Quack Quack हे अ‍ॅप्सही प्रसिद्ध आहेत. यातील ओके क्युपिड अ‍ॅपवर समलिंगी व्यक्तींनाही मॅचेस मिळू शकतात. तसंच LGBTQ कम्युनिटीसाठी विशेष असं Grindr हे अ‍ॅपही भारतात भरपूर लोकप्रिय आहे.

Dating Apps
AI Dating Tools : परफेक्ट लाईफ पार्टनर शोधण्यासाठी पठ्ठ्याने ChatGPT ला लावलं कामाला; 5,000 मुलींशी चॅट करून घेतला निर्णय!

खबरदारी महत्त्वाची

डेटिंग अ‍ॅप्सवरुन मैत्री करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीबाबत पूर्ण खात्री पटल्यानंतरच तिला भेटायला जाणं योग्य ठरतं. तसंच, ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तींसोबत पैशांचे व्यवहार करतानाही विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.