देशातील सर्वात मोठ्या डेटा चोराला पोलिसांनी पकडले आहे. वेब डिझाईनर म्हणून करीअरची सुरूवात केलेल्या विनय भारद्वाज याला सायबराबाद पोलिसांनी ७० कोटी नागरिकांचा गोपनीय डेटाबेस तयार करून क्लाउडवर विकल्याबद्दल पकडले.
विनय भारद्वाज मोठा सायबर चोर बनण्यापूर्वी वेब डिझायनर होता. त्याने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बिझनेस नेटवर्किंगने बेकायदेशीर डेटा विकण्यास सुरूवात केली. या माध्यमातून त्याने डेटा विकून झटपट पैसे कमवले.
दरम्यान विनय भारद्वाजला ७० कोटी व्यक्ती आणि संस्थांचा वैयक्तिक आणि गोपनीय डेटा चोरणे, ताब्यात ठेवणे आणि विकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
भारतातील सर्वात मोठा डेटा चोरीचा आरोपी विनय भारद्वाजकडे बायजू, वेदांतू, कॅब वापरकर्ते, जीएसटी, आरटीओ, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, पेटीएम आणि फोन-पे यासह अनेक मोठ्या कंपन्यांचा डेटा आहे.
सायबर क्राईममध्ये भारद्वाज बादशाह झाला होता. त्याने गुजरात-आधारित कापड व्यावसायिकासाठी एक वेबपेज तयार केले होते. या पेजवर त्याने डेटा गोळा करण्याची आणि विकण्यासाची ऑफर दिली. यामुळे त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळाले आणि त्याने डेटा डेटा चोरण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात केली.
सायबराबादच्या एका वरिष्ठ पोलीस अधिराऱ्यानेटाइम्स ऑफ इंडियाया दिलेल्या माहितीनुसार, शेकडो लोक या व्यवसायात आहेत आणि अनेकांच्या स्वतःच्या वेबसाइट आहेत. जे यावर संवेदनशील माहिती विकतात. ग्राहकांचा आधार डेटा खासगी व्यावसायिकांनी लीक केला आहे. हे प्रकरण खोलवर रूजले आहे. या प्रकरणी अधिक तपास करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
एक ई-कॉमर्स व्यवसाय ऑपरेटर ७७ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ग्राहकांचा डेटा राखत असल्याचे पाहून सायबराबाद पोलिसांना धक्का बसला. हा डाटा लीक देखील झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.