Smartwatch Bacteria : स्मार्ट वॉच, फिटनेस बॅण्ड घालताय? तर तुमचे आरोग्य आहे धोक्यात; संशोधनातून खुलासा

FAU Research : फिटनेस बँडवर सर्वाधिक स्टॅफायलोकोकस बॅक्टेरिया
Dangerous bacteria found on smartwatch bands
Dangerous bacteria found on smartwatch bandsesakal
Updated on

Smartwatch Bacteria : आजकाल स्मार्टवॉचची फॅशन सुरु आहे. लोक आवडीने नानाविध कंपन्यांचे स्मार्टवॉच घालतात. अनेक फीचर्स असलेले स्मार्टवॉच लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. ज्यामध्ये कॉल,मेसेज,हार्टबीट तपासणे,गाणी,अन्य बरेच पर्याय उपलब्ध असतात. पण सातत्याने जर तुम्ही स्मार्टवॉच (Smartwatch) घालत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्यांची घंटा आहे. कारण नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून स्मार्टवॉच बद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फ्लोरिडा एटलांटिक विद्यापीठाच्या (FAU) संशोधकांनी केलेल्या अभ्यासात वेगवेगळ्या स्मार्टवॉचच्या बँडची परीक्षण केले असता त्यापैकी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त भागावर बॅक्टेरिया आढळले आहेत.

Dangerous bacteria found on smartwatch bands
Scientist Shrinivas Kulkarni : कोल्हापूरच्या शास्त्रज्ञाला मिळणार खगोलशास्त्रातील प्रतिष्ठित शॉ पुरस्कार!

स्टॅफाइलोकोकस, एंटरॉबॅक्टेरिया आणि स्यूडोमोनस अशा संभाव्य संसर्गजन्य जीवाणूंची ही परीक्षा करण्यात आली. विशिष्ट परिस्थितींमध्ये हे सर्व प्रकारचे बॅक्टेरिया संसर्ग (Smartwatch Bacteria) फैलावण्यास कारणीभूत ठरू शकतात.

या अभ्यासादरम्यान लक्षात आले की, रबर आणि प्लास्टिकच्या बँडवर सर्वाधिक बॅक्टेरिया आढळले तर धातूच्या बँडवर बॅक्टेरियाचे प्रमाण अगदी कमी होते.

"प्लास्टिक आणि रबरच्या बँडवर असलेल्या छिद्राळ आणि पृष्ठभागावर बॅक्टेरिया सहज वाढू शकतात," असे फ्लोरिडा एटलांटिक विद्यापीठाचे जैव वैज्ञानिक नवाडियूटो एसिओबू यांचे म्हणणे आहे. या अभ्यासाने आपल्या स्वच्छतेच्या सवयींकडे लक्ष वेधले आहे. (Smartwatch cleaning) आपण दिवसभर घड्याळे आणि इतर स्मार्ट गॅझेट्स वापरतो पण त्यांची स्वच्छता करायचा विसर पडतो.

Dangerous bacteria found on smartwatch bands
Russian Spacecraft : रशियाने 'Space Weapon' लाँच केल्याचा अमेरिकेचा आरोप !

या अभ्यासात आढळलेले बॅक्टेरिया हे आपल्या शरीरावर आणि आजूबाजूच्या वातावरणात सहसा आढळणारे आहेत. मात्र, अनुकूल परिस्थितींमध्ये ते त्वचेवर फोड येणे, न्यूमोनिया आणि साल्मोनेलासारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. (Smartwatch harmful) फिटनेस बँडवर सर्वाधिक स्टॅफायलोकोकस बॅक्टेरिया आढळतात.

"आम्हाला बँडवर आढळलेल्या बॅक्टेरियांची संख्या आणि प्रकार पाहता त्यांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात असले तरी हे बॅक्टेरिया immuncompromised लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. विशेषत: हॉस्पिटलच्या वातावरणात काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफसाठी त्यांच्या घड्याळांची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे," असे एसिओबू यांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.